रॅपर बादशाहने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. काही महिन्यांपूर्वी त्याने 'खानदानी शफाखाना' या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. बादशाहाचा जन्म दिल्लीतील पंजाबी कुटुंबात झाला. बादशाहचे खरं नाव आदित्य प्रतिक सिंग सिसौदिया आहे. बॉलीवूडमध्ये मात्र तो बादशाह नावावने ओळखला जातो. 2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते.
आई-वडिलांच्या इच्छेखातर बादशाहने इंजिनिरिंगचे शिक्षण घेतले पण त्याला माहिती होते त्याला काय करायचे आहे ते. त्याला लहानपणापासूनच संगीताची गोडी होती त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर तो त्याकडे वळलो. जर बादशाह गायक झाला नसता तर तो आयएएस अधिकारी झाला असता असे त्यांने एका मुलाखतीत सांगितले होते.
'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यानंतर त्याला खरी ओळख मिळाली कारण या गाण्यात त्याचा चेहरा देखील दिसला होता. याआधी त्याचं 'सैटरडे -सैटरडे' हे गाणं सुद्धा आले होते मात्र अभी तो पार्टी शुरु हुई है'नंतर प्रेक्षक त्याला बादशाह म्हणून ओळखू लागले.