पंजाबी गायक हनी सिंग त्याच्या रॅप गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. चित्रपटसृष्टीत त्यांनी एकापेक्षा एक गाणी गायली आहेत. हनी सिंगने त्याची पत्नी शालिनीपासून घटस्फोट घेतला आहे. खरं तर, गेल्या वर्षी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, कौटुंबिक हिंसाचार आणि इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. आता या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे आणि शालिनीला पोटगी म्हणून कोट्यवधींची रक्कम मिळाली आहे.
न्यायालयाने हनी सिंगला २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत नोटीस बजावली होती. अखेर गुरुवारी दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर हे प्रकरण मिटले. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च २०२३ रोजी होणार आहे, ज्यामध्ये पुढील प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. शालिनीने आपल्या तक्रारीत अनेक महिलांशी संबंध ठेवून शालिनीची फसवणूक केल्याचा आरोप हनी सिंगवर केला होता.
हनी सिंगवर पत्नीचे गंभीर आरोपहनी सिंगने आपल्यावर अत्याचार केल्याचे शालिनीने सांगितले होते. या लग्नाला दहा वर्षे झाली, पण त्या बदल्यात तिला फक्त यातनाच मिळाल्या. शालिनी तलवार हिने रॅपरवर घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. शालिनी तलवारने 'कौटुंबिक हिंसाचार, महिला संरक्षण कायद्या'अंतर्गत १० कोटी रुपयांची भरपाई मागितली होती, मात्र तिला १ कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाल्याची माहिती समोर येते आहे.
हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचे शाळेत असल्यापासून एकमेकांवर प्रेम होते. २०११ मध्ये त्यांनी लग्न केले. त्याआधी ते शाळेपासून अर्थात साधारण २० वर्षे डेट करत होते. त्यानंतर त्यांनी १० वर्षांचा संसार केला.