Join us

पहिल्या पत्नीपासून वेगळा होताच बादशाहच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री, 1 वर्षांपासून गुपचूप करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 17:07 IST

बादशाह सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले आहे.

रॅपर बादशाहने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली. सोशल मीडियावर बादशाहची मोठी फॅन फॉलोईंग आहे. 2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. लहान म्युझिक अल्बममधून गायला सुरुवात केलेल्या बादशाने बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमवले आहे. बादशाह सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे.

बादशाह पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर  सिंगल असल्याचं सांगतोय मात्र एक वर्षापूर्वीच त्याच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. बादशाह एक पंजाबी अभिनेत्रीला डेट करतो आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, बादशाह ईशा रेखीसोबत रिलेशनशिपमध्ये दोघे. इतकंच नव्हे तर गेली एक वर्ष हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. 

लाईमलाईटपासून दूर ठवतो पर्सनल लाईफबादशाह अलीकडेच 'Fabulous Lives Of Bollywood Wives' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. तसेच करण जोहरशी बोलताना बादशाहने स्वतःला सिंगल म्हटलं होतं. यानंतर आता बादशाह ईशा रेखीच्या डेटिंगच्या बातम्यासमोर येतायेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. बादशाहला त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही. तो आपलं पर्सनल लाईफ लाईमलाईटपासून दूर ठेवणं पसंत करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बादशाह आणि ईशा रेखीनेही त्यांच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले आहे. मात्र, दोघांनाही नात्याबाबत कोणतीही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नाहीय. 

बादशाहचं पहिलं लग्न झालं आहे. मात्र, पत्नीसोबत झालेल्या वादानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. बादशाहची पत्नी जस्मिन आता वेगळी राहते. 2019 मध्ये दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनाही एक मुलगी आहे. मात्र, या वादानंतर दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जस्मिन आपल्या मुलीसोबत लंडनमध्ये राहते. तर बादशाह दिल्ली, मुंबई आणि चंदीगडमध्ये राहतो.

टॅग्स :बादशहासेलिब्रिटी