Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. ८ महिन्यांपूर्वीच राखीने बॉयफ्रेंड आदिल खानसोबत (Adil Khan) लग्न केले. कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर करत राखीने पुन्हा इतरांचे स्वत:कडे लक्ष वेधले आहे. इतकंच नाही तर आदिल सोबत निकाह करुन तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. तसेच तिचे नाव बदलून फातिमा करण्यात आले आहे. राखीच्या या नव्या ड्रामामुळे सध्या ती प्रचंड ट्रोल होत आहे. आता राखीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती बुरखा घालून रुग्णालयात जाताना दिसत आहे. फोटोग्राफर्सकडे दुर्लक्ष करत ती रुग्णालयात जाताना दिसत आहे. यावर तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.
सध्या राखी सावंत चर्चेत असल्याने फोटोग्राफर्स म्हणजेच पापाराझी नेहमी तिच्यामागे असतात. ती सुद्धा लाईमलाईटचा पुरेपुर फायदा करुन घेत आहे. त्यातच लग्न, प्रेग्नंसी, मिसकॅरेजच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. राखीची आई ब्रेन ट्युमरशी झुंज देत असून क्रिटिकेअर (Criticare) रुग्णालयात उपचार घेत आहे. आईला भेटण्यासाठी राखी रुग्णालयात जात असतानाचा तिचा व्हिडिओ समोर आला. पण व्हिडिओ पाहून युझर्सने तिच्यावर निशाणा साधला. राखीचा पेहराव बघून नेटकरी चांगलेच भडकले. काळ्या रंगाचा हिजाब आणि ग्रे रंगाचा बुरखा घालून राखी आली होती. आदिल खानशी लग्न करुन पेहरावही बदलला असं म्हणत ती आता ट्रोल होत आहे.
तर आणखी एका व्हिडिओत रुग्णालयात राखी आईची भेट घेत असल्याचं दिसत आहे. तिच्या आईची तब्येत खूपच खालावलेली दिसत आहे. मम्मी, आदिल आया है असं ती आईला सांगते. यानंतर आदिल आणि राखी सोबत निघताना दिसतात.
Rakhi Sawant-Mukesh Ambani : राखी सावंतसाठी मुकेश अंबानी सरसावले, आईच्या उपचारासाठी करतायत मदत
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सही भन्नाट आहेत. नौ सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, दोन दिवसांचं नाटक आहे हे अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत. राखीने बुरखा घालणं नेटकऱ्यांना अजिबात पटलेले नाही. म्हणून तिच्यावर ट्रोलर्सने निशाणाच साधला आहे.
राखी सावंत नुकतीच मराठी बिग बॉस ४ (Bigg Boss marathi 4) मध्ये सहभागी झाली होती. या तिने चॅलेंजर म्हणून घरात प्रवेश केला होता. तिने टॉप ५ पर्यंत मजल मारली. मात्र ९ लाख रुपये स्वीकारत ती नंतर स्पर्धेतून बाहेर पडली.