सलमान खानने आजवर अनेक स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लाँच केलं. सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अथिया शेट्टी इत्यादी अनेक अभिनेत्री भाईजानच्या सिनेमातून पुढे आल्या आहेत. आज या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चांगल्याच लोकप्रिय आहेत. सलमानची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी मैत्री असल्याने त्यांची मुलंही भाइजानच्या खांद्यावर खेळली आहेत. सलमानचा असाच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोत एक लहान मुलगी दिसत असून आज ती लोकप्रिय अभिनेत्री झालीय.
सलमानसोबत दिसणारी ही छोटी मुलगी आज अभिनेत्री
सलमान खानसोबत दिसणारी ही छोटी मुलगी लवकरच अजय देवगणसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या मुलीचं नाव आहे राशा थडानी. (rasha thadani) राशाचा हा लहानपणीचा फोटो व्हायरल झाला असून ती सलमान खानसोबत मस्ती करताना दिसतेय. राशा लवकरच अजय देवगणसोबत 'आझाद' (azaad) सिनेमात दिसणार आहे. याच सिनेमात अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण राशासोबत पदार्पण करणार आहे. राशा ही अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आहे.
कधी रिलीज होणार आझाद?
काहीच दिवसांपूर्वी राशा थडानीची प्रमुख भूमिका असलेल्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमातून राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. राशाचं या सिनेमातलं 'उई अम्मा' हे गाणं सध्या ट्रेंडिंगवर आहे. या गाण्यात राशाने केलेला डान्स आणि तिच्या अदांवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. सिनेमा रिलीज झाल्यावर राशाचा अभिनय कसा झालाय, हे कळेलच. 'आझाद' सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने राशा नुकतीच 'बिग बॉस १८'च्या मंचावर सलमानसोबत सहभागी झाली होती.