Join us

पापाराझींनी केले कौतुक अन् रश्मिकाने मारला डोळा; क्यूट एक्सप्रेशन कैमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 20:24 IST

रश्मिका मंदानाने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला, यानंतर पापाराझींसोबत मस्ती केली.

Rashmika Mandana : 'पुष्पा' चित्रपटानंतर नॅशनल क्रशचा टॅग मिळालेली अभिनेत्री रश्मिका मंदानाने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडमध्ये नवोदित असूनही तिची लोकप्रियता इथल्या टॉप अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. यासोबतच तिच्या सुंदर स्माईल आणि घायाळ करणाऱ्या डोळ्यांचे लोक वेडे आहेत. यातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तिचे क्यूट एक्सप्रेशन पाहून पापाराझीही घायाळ झाले आहेत.

रश्मिकाची पापाराझीसोबत मस्ती नुकतीच रश्मिका लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली होती. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका पापाराझींसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ लॅक्मे फॅशन वीकमध्ये रश्मिकाच्या रॅम्प वॉकनंतरचा आहे, ज्यामध्ये पापाराझी रश्मिकाच्या चालण्याचे कौतुक करतान दिसले. यावेळी रश्मिकाने हसून त्यांना डोळा मारला. तिचे क्यूट एक्सप्रेशन कॅमेऱ्यात कैद झाले. 

रणबीर कपूरसोबत पुढील चित्रपटव्हिडिओमध्ये रश्मिकाच्या या लूकचे चाहते कौतुक करत आहेत. दरम्यान, रश्मिका बॉलिवूडमध्येही एकामागून एक चित्रपट करत आहे. रश्मिका रणबीर कपूरसोबत 'अनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती अल्लू अर्जुनसोबत पुष्पा 2 या चित्रपटातही श्रीवल्लीची भूमिका साकारताना दिसेल. अलीकडेच ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत गूडबाय चित्रपटात दिसली होती.

टॅग्स :रश्मिका मंदानाबॉलिवूडTollywood