'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका आहे. 'छावा' सिनेमा काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशल-रश्मिका मंदाना या सिनेमात अनुक्रमे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहेत. अशातच 'छावा' सिनेमाच्या प्रमोशनवेळचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत रश्मिका विकीला ओवाळताना दिसतेय.
'छावा' सिनेमाच्या प्रमोशनचा व्हिडीओ
'छावा' सिनेमाचा प्रमोशनल इव्हेंट आज झाला. या इव्हेंटमध्ये रश्मिका व्हीलचेअरवर एन्ट्री मारते. विकी तिला घेऊन येताना दिसते. पुढे इव्हेंटमध्ये एका गाण्यावर सर्व डान्सर नृत्य करताना दिसतात. रश्मिकाला चालता येत नसल्याने ती व्हीलचेअरवरच बसलेली दिसते. पुढे तिच्या हातात आरतीचं ताट असतं. ती विकीला व्हीलचेअरवर बसूनच ओवाळते. विकी सुद्धा रश्मिकाला त्रास होऊ नये म्हणून गुडघ्यावर बसतो. या दोघांचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
'छावा' सिनेमाची उत्सुकता शिगेला
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणून 'छावा' ओळखला जातोय. 'छावा' सिनेमा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जगभरात रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षय खन्ना ओरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय संतोष जुवेकर, सुव्रत जोशी आणि शुभंकर एकबोटे हे मराठी कलाकारही 'छावा'मध्ये दिसणार आहेत.