Rashmika Mandana Apologizes Fans:रश्मिका मंदान्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'मिशन मजनू' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. यादरम्यान रश्मिका मंदान्ना 'मिशन मजनू'च्या स्क्रिनिंग वेन्यू बाहेर चाहत्याची माफी मागताना दिसली.
रश्मिकाने मागितली चाहत्याची माफी रश्मिकाने तिचा सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. त्याचवेळी कियारा अडवाणी आणि करण जोहरही स्क्रिनिंगला पोहोचले. रश्मिका मंदान्ना वेन्यूवर पोहोचताच जमावाने तिला घेरले. पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका स्क्रिनिंगच्या वेन्यूवरुन कारमध्ये बसताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांचे मोठ्या हसत स्वागत केले. यादरम्यान तिची कार गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसली. अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला गर्दीचा सामना करावा लागला , परंतु रश्मिकाला पापाराझी आणि चाहत्यांच्या सुरक्षेची देखील काळजी होती. यादरम्यान ती कोणाची तरी माफी मागताना देखील दिसली.
'मिशन मजनू'च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी रश्मिका कॅज्युअल आउटफिटमध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीने निळा स्लीव्हलेस क्रॉप टॉप घातला होता आणि त्यावर हिरव्या रंगाच्या पँट घातली होता. तिने स्क्रीनिंगपूर्वी कॅमेऱ्यांसाठी पोज दिली आणि प्रीमियरला जाण्यापूर्वी पापाराझींशी संवाद करताना देखील दिसली.
'मिशन मजनू' हा रश्मिकाचा बॉलिवूडमधील दुसरा चित्रपट आहे. या स्पाय थ्रिलरमध्ये रश्मिता एका भारतीय गुप्तहेराच्या प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रश्मिका लवकरच अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2' या मोस्ट अवेटेड चित्रपटात दिसणार आहे.