Join us

Rashmika Mandanna: पहिलावहिला चित्रपट ठरला सुपरहिट अन्, लहान वयातच रश्मिका मंदान्ना बनली नॅशनल क्रश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 8:00 AM

पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत.

साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या पाच वर्षात नॅशनल क्रश बनली आहे. तसेच तिने फिल्मी दुनियेत घवघवीत यश मिळवून. पुष्पा चित्रपटाना तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. रश्मिका आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करते आहे. पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत.

 साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही रश्मिकाची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. गेल्या  पाच वर्षांत तिनं नाव कमावलं, ऐश्वर्य कमावलं. 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकच्या कोडागु येथे जन्मलेल्या रश्मिकाने 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती. रश्मिकाचा पहिलाच सिनेमा गाजला. बेस्ट डेब्यू अ‍ॅक्ट्रेस इन कन्नडचा पुरस्कार तिला मिळाला.

 शिवाय या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर रश्मिका प्रेमातही पडली. होय, त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. ‘किरिक पार्टी’चं शूटींग सुरू असतनाच रश्मिका तिचा सहअभिनेता रक्षित शेट्टीवर भाळली. जुलै 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. पण हे नातं फार टिकलं नाही.सप्टेंबर 2018 मध्ये रश्मिकाने साखरपुडा मोडला. यानंतर रश्मिका काही काळ नैराश्यात गेली होती. पण ती लगेच सावरली आणि तिनं स्वत:ला कामात झोकून दिलं. साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना एका चित्रपटात काम करण्यासाठी सुमारे 3 ते 4 कोटी रुपये घेते. रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना यांच्याकडे 30 कोटींची संपत्ती आहे. तिच्याकडे आलिशान व्हिला देखील आहे, जो बंगळुरूमध्ये आहे, त्याची किंमत 8 कोटी आहे. . रश्मिका रणबीर कपूरसोबत 'अनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती अल्लू अर्जुनसोबत पुष्पा 2 या चित्रपटातही श्रीवल्लीची भूमिका साकारताना दिसेल. 

टॅग्स :रश्मिका मंदानाTollywood