Join us

Rashmika Mandanna : श्रीवल्लीचं विजय देवरकोंडासोबत ब्रेकअप? आता या अभिनेत्याला डेट करतेय रश्मिका मंदाना?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 10:42 AM

Rashmika Mandanna : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा दीर्घकाळापासून ऐकायला मिळतेय. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय.

तेलगू व कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या रिलेशनशिपची. रश्मिका विजय देवरकोंडाला (Vijay Devarakonda) डेट करतेय, अशी चर्चा दीर्घकाळापासून ऐकायला मिळतेय. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, रश्मिका व विजय देवरकोंडाचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय. कारण काय तर रश्मिकाच्या आयुष्यात आता नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाल्याचं म्हटलं जात आहे. 

रश्मिका गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडासोबत कमी अन् तेलगू अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवाससोबत ( Bellamkonda Srinivas) अधिक दिसू लागलीये. त्यामुळे रश्मिका सध्या बेल्लमकोंडा श्रीनिवासला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अलीकडे दोघंही मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले होते. अनेक पब्लिक इव्हेंटमध्येही दोघंही जोडीने सहभागी होत आहेत. अलीकडे एका पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर दोघांनी सोबतच एंट्री केली होती.

अनेक न्यूज रिपोर्टनुसार, रश्मिका व श्रीनिवास एकमेकांना पसंत करतात. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हणणं घाईचं ठरेल. पण लवकरच ते दोघं एकमेकांना डेट करू लागले तर आश्चर्य वाटणार नाही.

आत्ताआत्तापर्यंत रश्मिका व विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. दोघांनी गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड, वर्ल्ड फेमस लव्हर अशा चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. या सिनेमाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली आणि एकमेकांना डेट करू लागल्याचं म्हटलं गेलं होतं. मध्यंतरी दोघंही एकत्र व्हॅकेशनवरही गेल्याची चर्चा होती. दोघंही अनेकदा एकत्र दिसले  होते. अर्थात दोघांनीही कधीही याची कबुली दिली नाही. विजय माझा चांगला मित्र आहे. मी त्याच्यासोबत फिरायला गेले तर त्यात काहीही चुकीचं नाही, असं रश्मिका म्हणाली होती.

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाTollywood