Join us

डीपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांना मिळाले पुरावे, आरोपींना लवकरच अटक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:47 AM

दिल्ली पोलिसांना केससंबंधित काही पुरावे हाती लागले आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मध्यंतरी डीपफेक (Deepfake Video) व्हिडिओची शिकार झाली होती. तिचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हा प्रकार नक्की कोणी केला याची चौकशी सुरु झाली. आता या प्रकरणी नवीन अपडेट आलं आहे. दिल्ली पोलिसांना केससंबंधित काही पुरावे हाती लागले आहेत. त्याआधारे पुढील तपास केला जात आहे. 

पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'सायबर अधिकारी सर्व आयपी अॅड्रेसचा पाठपुरावा करत आहेत ज्यावरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. तसंच ज्याठिकाणाहून व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड झाला याचीही चौकशी सुरु आहे. 

पोलिस उपायुक्त (IFSO स्पेशल सेल) हेमंत तिवारी यांनी सांगितले की, 'आम्हाला काही महत्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. दिल्ली महिला आयोगाकडून नोटीस मिळाल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या इंटिलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स(IFSO) ने अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.'

यापूर्वी आयटी मंत्री अश्विनी वैष्णवने सोशल मीडियावर याप्रकरणी पोस्ट केली होती.भविष्यात लोकशाहीसाठी हा धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. सरकार लवकरच डीपफेकप्रकरणी कडक नियम लावेल. 

टॅग्स :रश्मिका मंदानासायबर क्राइमसोशल व्हायरल