दाक्षिणात्य कलाविश्वातील श्रीवल्ली अर्थात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आज अनेकांची क्रश आहे. त्यामुळे आजच्या घडीला ती नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते. रश्मिका कुठेही दिसली तरीदेखील तिची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी चाहते पुढे सरसावतात. साऊथमध्ये जम बसवणाऱ्या रश्मिकाचा हळूहळू बॉलिवूडमध्येही वावर वाढू लागला आहे. त्यामुळे अलिकडेच तिने चित्रपट निर्माता करण जोहरच्या बर्थ डे पार्टीमध्ये हजेरी लावली होती. मात्र, या पार्टीत गेल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
रश्मिका तिच्या अभिनयासह लक्झरी लाइफस्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळेही चर्चेत असते. मात्र, यावेळी तिच्या ड्रेसमुळेच तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. रश्मिकाने या पार्टीसाठी काळ्या रंगाचा बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा काही भाग नेटपासून तयार केला होता. या ड्रेसमध्ये रश्मिका चांगलीच हॉट दिसत होती. मात्र, या कपड्यांमध्ये तिला वावरतांना अनकन्फर्टेबल वाटत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. त्यामुळेच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात रश्मिकाला या डिझायनर ड्रेसमध्ये व्यवस्थित चालता येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ती वारंवार तिचा ड्रेस सावरत आहे. तसंच फोटो काढतानाही ती अनकन्फर्टेबल असल्याचं पाहायला मिळालं.
"जर अनकन्फर्टेबल वाटतंय तर असा ड्रेस घातलाच का?", असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, "प्रचंड वाह्यात ड्रेस आहे", यांना बिकिनी परिधान केल्यावर लाज वाटत नाही.पण, असे ड्रेस घातले की लाज वाटते", अशा किती तरी कमेंट या पोस्टवर आल्या आहेत.
दरम्यान, 'पुष्पा' चित्रपटात झळकेली रश्मिका लवकरच 'मिशन मजनू' या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसंच ती 'अॅनिमल' आणि 'गूड बाय' चित्रपटातही दिसणार आहे.