Join us

रश्मिकाची धनुषसोबत जमणार जोडी, या सिनेमात एकत्र झळकणार दोन सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 16:09 IST

रश्मिका आणि धनुष पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तिची जोडी अभिनेता धनुषसोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना धनुषसोबत त्याच्या 51 व्या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव 'D51' आहे. याचे दिग्दर्शन शेखर कममुला करणार आहेत. रश्मिका आणि धनुष पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट बिग बजेट असून अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. धनुषच्या वाढदिवसापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचे कॉन्सेप्ट पोस्टर रिलीज केले होते. सध्या त्याची कथा आणि इतर पात्रांबाबतची उर्वरित माहिती अद्याप समोर आलेली नाही.

धनुष सध्या 'कॅप्टन मिलर'च्या रिलीजमुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. पोस्टर बघून अंदाज बांधता येतो की त्यात बरीच अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय धनुषकडे आनंद एल राय यांचा 'तेरे इश्क में' चित्रपटही आहे.

दुसरीकडे रश्मिका मंदान्नाही अनेक चांगल्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 'एनिमल' यापैकी एक आहे. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या 'एनिमल' या चित्रपटात रश्मिका मंदान्ना अभिनेता रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटाच्या 'पुष्पा २' च्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे. रश्मिका 'एनिमल'बद्दल खूप उत्साहित आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रश्मिका मंदान्नाने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, डिसेंबर महिना तिच्यासाठी खूप लकी ठरला आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटापासून या महिन्यात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. 

टॅग्स :रश्मिका मंदाना