Join us

बॉलिवूडच्या या सुपरस्टार सोबत दिसणार रश्मिका मंदाना, परिणीतीची सिनेमातून पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:31 IST

Animal या सिनेमात परिणीती चोप्रा दिसणार असं बोललं जात होतं. पण तिचा पत्ता 'पुष्पा'तील श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) कट केलाय.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoo) च्या आगामी 'Animal' सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. निर्मात्यांनी जेव्हापासून या सिनेमाची घोषणा केली तेव्हापासून सिनेमाची चर्चा सुरू आहे. अशात या सिनेमात रणबीरची हिरोईन कोण होणार याची वाट बघत होते. आता ते कन्फर्म झालं आहे. या सिनेमात परिणीती चोप्रा दिसणार असं बोललं जात होतं. पण तिचा पत्ता 'पुष्पा'तील श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) कट केलाय.

याआधी Animal च्या दिग्दर्शकांनी सिनेमासाठी परिणीती चोप्राला संपर्क केला होता. आता ताज्या रिपोर्टनुसार, रश्मिकाची या रोलसाठी निवड केली आहे. असं सांगितलं जात आहे की, आता परिणीती चोप्रा Animal चा भाग नसणार आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीरच्या Animal मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी रश्मिका मंदानाला साइन केलं आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, निर्माते भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वांगा यांना वाटतं की, सिनेमासाठी रश्मिका एकदम परफेक्ट आहे. त्यांना रणबीरसोबत नवीन हिरोईन हवी होती. त्यामुळे त्यांनी रश्मिकाला साइन केलं. 

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, रश्मिका या सिनेमात रणबीर कपूरच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. Animal सिनेमाचं दिग्दर्शन तेलुगु दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. संदीप रेड्डीने अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंह सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :रश्मिका मंदानारणबीर कपूरबॉलिवूड