Join us

मोहम्मद झीशान अय्युबची पत्नी आहे मराठमोळी अभिनेत्री; 'स्कूप'मध्ये केलंय तिने काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 10:38 AM

Mohammad Zeeshan Ayyub:

कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह केला आहे. यात बऱ्याच कलाकारांची लग्नानंतरची लाइफ चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री रसिका आगाशे हिची चर्चा रंगली आहे. रसिकाने अभिनेता मोहम्मद झीशान अय्युब याच्यासोबत लग्न केलं आहे. अलिकडेच ही जोडी स्कूप या वेब सीरिजमध्ये झळकली. या सीरिजची सोशल मीडियावर चर्चा होत असतानाच या जोडीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रसिकाने तिच्या आंतरधर्मीय लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

सध्या ओटीटीवर स्कूप ही वेबसीरिज तुफान चालत आहे. या सीरिजमध्ये करिश्मा तन्ना आणि अभिनेता मोहम्मद झीशान अय्युबची (Mohammad Zeeshan Ayyub) मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या सीरिजच्या निमित्ताने मोहम्मद झीशान अय्युब आणि त्याची पत्नी अभिनेत्री रसिका आगाशे यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केलं आहे.

अलिकडेच या जोडीने  सिद्धार्थ कन्ननला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर कशा प्रकारचा अनुभव आला हे सांगितलं.  मुलाखत सुरु असताना सिद्धार्थने रसिकाला काही वर्षापूर्वी तिने केलेल्या एका ट्विटविषयी प्रश्न विचारला. तिने हिंदू आणि मुस्लीम धर्मावरील एका ब्रॅंडच्या जाहिरातीबाबत ट्विट केलं होतं. परंतु, अनेकांनी तिला विरोध केल्यानंतर तिने हे ट्विट डिलीट केलं. या ट्विटविषयी बोलत असताना तिने तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टीचाही खुलासा केला.

काय म्हणाली रसिका?

''ते ट्विट मी डिलीट केलं आणि त्याच्याविषयी विचार करणं बंद केलं. त्याकाळात सोशल मीडिया माझ्यासाठी खूप नवीन होतं. मी झीशानला विचारलं की मी काय केलंय. त्याने मला सांगितलं सोशल मीडियावर काय सुरु आहे पाहा. मी, पाहिल्यावर तेव्हा मला समजलं की, अच्छा याला ट्रोलिंग म्हणतात का?, असं रसिका म्हणाली.

 पुढे ती म्हणते, "मी झीशानला कायम सांगते, मी या देशातील बहुसंख्यांकाचा एक भाग आहे. त्यामुळे मला जास्त विचार न करता मी बऱ्याच गोष्टी करु शकते. ज्याप्रमाणे मी करते तसंच त्यालादेखील त्या करता याव्यात असं मला वाटतं. बहुसंख्यांकाचा भाग असल्यामुळे अल्पसंख्यांकांना प्रत्येक गोष्टींचा इतका विचार करावा लागतो हे पाहून फार वाईट वाटतं."

दरम्यान,  रसिका एक मराठमोळी अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक नाटक, मालिका, चित्रपट, ओटीटी, जाहिरातींमध्ये काम केलं आहे. रसिका आअि मोहम्मद झीशान अय्युब यांची पहिली भेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाली. येथूनच त्यांच्या मैत्रीचा आणि मगपुढे प्रेमाचा प्रवास सुरु झाला.

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटीसिनेमा