Join us  

'अभिनेत्रीसारखी दिसत नाही म्हणून...' रत्ना पाठक यांना करावा लागता होता रिजेक्शनचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 1:49 PM

अभिनेत्री रत्ना पाठक शहा हटके भूमिकांसाठी ओळखल्या जातात.

'साराभाई vs साराभाई' या विनोदी मालिकेतून अभिनेत्री रत्ना पाठक शहा (Ratna Pathak Shah) यांना प्रसिद्धी मिळाली. मालिकेत त्यांनी सासूच्या भूमिकेतून धम्माल आणली. यातील प्रत्येक पात्रानेच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र रत्ना पाठक यांनी कधी सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका का साकारली नाही याचं कारण आता समोर आलंय. अभिनेत्रीने स्वत:च याचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री रत्ना पाठक शहा हटके भूमिकांसाठी ओळखल्या जातात. 1983 मध्ये रिलीज झालेल्या 'मंडी' सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांना या क्षेत्रात ३ दशकांहून अधिक काळ लोटला आहे.  'गोलमाल ३', 'मिर्च मसाला', 'जाने तू या जाने ना', 'खूबसूरत' यासारख्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका केली. तर 'साराभाई वर्सेस साराभाई', 'फिल्मी चक्कर', 'इधर उधर' या टीव्ही मालिकांमध्येही काम केले. 

दरम्यान एक वेळ अशी आली जेव्हा इतका अनुभव असूनही त्यांना काम मिळत नव्हतं. एका मुलाखतीत त्यांनी ही खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या,' मी अभिनेत्रीसारखी दिसत नाही या कारणामुळे मला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. तसंही तेव्हा सिनेमांमध्ये महिलांप्रधान भूमिका मर्यादित होत्या. 

"नाहीतर तिचेही हाल परवीन बाबी, सुशांतसिंगसारखे झाले असते", प्रियांका चोप्राला सेलिब्रिटींचा पाठिंबा

टीव्हीमुळे मिळाली ओळख

रत्ना पाठक यांचं करिअर टीव्हीमुळेच झालं. छोट्या पडद्याने अभिनेत्रीला घरोघरी ओळख मिळवून दिली. तसंच त्यांना मालिकांमध्ये तेच ते टीपिकल रोल मिळाले नाहीत. 'साराभाई vs साराभाई' मालिकेत त्यांनी श्रीमंत सासू 'माया साराभाई' ची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. 

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडनसिरुद्दीन शाहपरिवार