Ratna Pathak Shah : ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक त्यांच्या पहिल्या गुजराती सिनेमा 'कच्छ एक्सप्रेस'च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पठाण सिनेमाच्या वादावर आपले मत व्यक्त केले. दरम्यान त्यांनी ट्रोलर्सला फटकारलेच आहे.
रत्ना पाठक म्हणतात, 'अनेक लोकांच्या ताटात अन्न नाही पण त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही. कोणी काय कपडे घातले यावर लोक संताप व्यक्त करत आहेत. रत्ना यांना पुढे विचारण्यात आले की, 'जेव्हा तुमचे कपडे हा मुद्दा संपूर्ण देशाचा चर्चेचा मुद्दा बनतो तेव्हा काय भावना असतात?' यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'जर हा मुद्दा तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी येतोय, जर तुम्ही हाच विचार करत असाल तर आपण चुकीचे करत आहोत. ही वेळच चुकीची आहे. हा असा मुद्दा नाहीये ज्याला मी फार महत्व देईन. यावर जास्त बोलायचीही माझी इच्छाही नाहीये.'
'आज देशात जितके समजुतदार लोक दिसत आहेत त्याहुन अधिक आहेत. भयाची, बहिष्काराची भावना जास्त दिवस राहत नाही. मला वाटते माणूस मर्यादेपलीकडे कटुता सहन करु शकत नाही. काही काळानंतर तुम्ही सततच्या घृणात्मक वृत्तीमुळे थकता. मी त्या दिवसाची वाट बघत आहे.'