प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या तिच्या आगामी वेब सीरिज 'कर्मा कॉलिंग'(Karma Calling) मुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीची ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी रवीना तिच्या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, ती अनेक मुलाखती देत आहे ज्यामध्ये ती अनेक रंजक खुलासे करत आहे.
रवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिने करण जोहरचा पहिला चित्रपट 'कुछ कुछ होता है' नाकारला होता. वास्तविक, करणच्या या चित्रपटात शाहरुख खान, काजोलसोबत राणी मुखर्जीही मुख्य भूमिकेत होती. पण राणीच्या आधी करणने रवीनाला ही भूमिका ऑफर केली होती. मात्र अभिनेत्रीने ती करण्यास नकार दिला.
सिनेमा नाकारल्यावर करणची प्रतिक्रिया काय होती?आता अलीकडेच रवीनाने ही भूमिका नाकारल्यावर करण जोहरची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की "आजही ती भूमिका न केल्याबद्दल करण माझ्याकडे जाब विचारतो. मी त्याला सांगते की तू मला आणखी काहीही करायला लावू शकतोस. एवढेच नाही तर धर्मा प्रॉडक्शन्सचा आणखी एक चित्रपट होता जो वरुण सूद आणि मी एकत्र करणार होतो, पण दुर्दैवाने तो होऊ शकला नाही.
या कारणामुळे रवीनाने हा चित्रपट नाकारला होतायाआधी गेल्या वर्षी एनआयला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने 'कुछ-कुछ होता है' न करण्याचे कारणही सांगितले होते. यावेळी तिने सांगितले होते की, चित्रपट न केल्यामुळे आजही करणने मला माफ केलेले नाही. पण मला त्यावेळी समजले नाही. काजोल आणि मी त्यावेळी एकमेकांचे स्पर्धक होतो. आम्ही दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होतो पण माझ्या भूमिकेला काजोलपेक्षा कमी महत्त्व होते आणि लहान होती. म्हणूनच मला ती करायची नव्हती. याच मुलाखतीत रवीना टंडननेही खुलासा केला की, तिने लोकप्रिय वेब सीरिज आर्याही नाकारली होती. यानंतर या मालिकेसाठी सुष्मिता सेनला कास्ट करण्यात आले.
'कर्मा कॉलिंग' या दिवशी येणार भेटीलारवीना टंडनच्या आगामी 'कर्मा कॉलिंग' या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. ही सीरिज २६ जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.