बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon)चे वडील रवि टंडन (Ravi Tandon) यांचे नुकतेच निधन झाले आहे. रवि टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. मजबूर, खुद्दार आणि अनहोनी यांसारखे सुपरहिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवि टंडन यांची मुंबईतील राहत्या घरी पहाटे प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने नुकतीच सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
रवि टंडन यांचे शुुक्रवारी पहाटे ३.४५ वाजता मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. रवि टंडन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी दिग्दर्शक आर. के. नय्यर यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करायला सुरूवात केली. लव इन शिमला आणि ये रास्ते हैं प्यार के या चित्रपटाच्या दिग्दर्शनातील बारकावे समजल्यानंतर रवि टंडन यांनी अनहोनी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले.या चित्रपटातील संजीव कुमार यांच्या अभिनयाची खूपच प्रशंसा झाली होती. त्यानंतर ऋषी कपूर यांच्यासोबत खेल खेल हा चित्रपट बनवला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
रवि टंडन यांच्या निधनानंतर नुकतीच रवीना टंडन हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहिलात. मी सदैव तुमचीच राहिन. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. लव्ह यू पप्पा. या पोस्टमध्ये रवीनाने वडिलांसोबतचे बालपणीपासून आतापर्यंतचे काही फोटो शेअर केले आहेत. रवीना टंडनच्या पोस्टवर तिचे चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री नीलम कोठारी, अभिनेता चंकी पांडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.