रविना टंडनने ‘या’ महिला केंद्रीय मंत्र्यास दिले सडतोड उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 10:40 AM
बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रविना टंडन हिने तिच्या ‘मातृ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविनाचा हा चित्रपट ...
बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रविना टंडन हिने तिच्या ‘मातृ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविनाचा हा चित्रपट महिलांच्या सुरक्षिततेवर आधारित असून, रविनाने प्रमोशनदरम्यानही महिलांच्या सन्मानाविषयी आवाज उठविला होता. मात्र रविनाचे काही वक्तव्य केंद्रीय महिला तथा बालविकासमंत्री मनेका गांधी यांना फारसे भावले नव्हते. त्यांनी, महिलांवर होणाºया अत्याचारास चित्रपटच कारणीभूत असल्याचे म्हटले होते. मात्र आता रविनाने मनेका गांधी यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. रविनाने एक ट्विट करताना त्याच्यासोबत एक क्लिप शेअर केली असून, त्यात लिहिले की, ‘ज्यांना ‘मातृ’ हा चित्रपट योग्य वाटत नाही, याचा अर्थ काही तरी गडबड आहे. या चित्रपटाचे सत्य कडू आहे. पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. मनेका गांधी (भारतीय जनता पक्ष)’ रविनाच्या या ट्विटला उत्तर देताना मनेका गांधीने लिहिले की, ‘होय, रविना! मीदेखील अशा घटनांमुळे चिंताग्रस्त आहे. आम्ही कित्येक पावले उचलून अशाप्रकारची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत’. त्यावर रविनाने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, होय, कायद्याचे पालन अन् अशाप्रकारच्या घटनांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. फास्ट ट्रॅक न्यायालयाचे उदाहरणे समोर ठेवण्याची गरज आहे’.रविनाने ‘मातृ’ या चित्रपटात महिलांवर होणाºया अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. महिलांना न्याय देण्यासाठी न्यायपालिका कशा पद्धतीने अपयशी ठरत आहे, यावरही चित्रपट प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अश्तर सय्यद यांनी केले आहे. क्रिटिक्स आणि प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट उतरत असल्याने रविना खूश आहे.