अभिनेत्री रवीना टंडनचा तिच्या नातवाबरोबर खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना रवीना ग्लॅमरस आजी म्हणून आवडली आहे. रवीना 2019 मध्ये आजी झाली आहे. रवीना टंडनची दत्तक मुलगी छायाने एका मुलाला जन्म दिला होता.
छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती. रवीना टंडनने या दोन्ही मुली वाढवल्या आणि त्यांचे लग्न केले. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. रवीनाने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या.