हां भाई, सच में किया...! लोकांचा विश्वास नाही म्हटल्यावर रवीना टंडनने थेट दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:39 PM2021-05-31T16:39:38+5:302021-05-31T16:42:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने काही दिवसांपूर्वी काही फोटो व एक छोटीशी व्हिडीओ क्लिप शेअर केली होती. अनेक युजर्सनी यावरून रवीना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.

raveena tandon posts proof video after people ask if she really worked on her farm | हां भाई, सच में किया...! लोकांचा विश्वास नाही म्हटल्यावर रवीना टंडनने थेट दिला पुरावा

हां भाई, सच में किया...! लोकांचा विश्वास नाही म्हटल्यावर रवीना टंडनने थेट दिला पुरावा

googlenewsNext
ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर येत्या काळात रवीना ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) काही दिवसांपूर्वी काही फोटो व एक छोटीशी व्हिडीओ क्लिप शेअर केली होती. वीकेंडमध्ये आपल्या शेतातील प्लास्टिक कचरा गोळा केल्याचे हे फोटो व क्लिप शेअर करत तिने सांगितले होते. पण ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना शेतात राबली, यावर कोण विश्वास ठेवणार? अनेक युजर्सनी यावरून रवीना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. खरंच कचरा गोळा केला की फक्त फोटो सेशन केले, असा सवाल अनेकांनी तिला केला होता.

आता चाहत्यांनी हा इतका पराकोटीचा अविश्वास दाखवल्यानंतर ‘मस्त मस्त गर्ल’ शांत कशी बसणार? तिने लगेच पुरावा दिला.
होय, रवीनाने थेट एक लांबलचक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती हातात फावडे घेऊन शेतातील कचरा व प्लास्टिक काढताना दिसतेय. ‘हां भाई, सच में किया... अनेकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. मी खरंच प्लास्टिक गोळा केले का? असा प्रश्न मला केला गेला. याआधी मी अगदी छोटीशी क्लीप शेअर केली होती. कारण माझ्या खोदकामाची क्षमता दाखवून तुम्हाला पकवण्याचा माझा इरादा नव्हता. पण आता हा व्हिडीओ बघा़ मी काम करत असताना मला शूट केले जातेय, हे मला माहित नव्हते़,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिल आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर येत्या काळात रवीना ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमात दिसणार आहे. थिएटर बंद असल्यामुळे या सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. याशिवाय लवकर रवीना ओटीटीवर डेब्यू करणार आहे. नेटफ्लिक्सच्या ‘आरण्यक’ या वेबसीरिजमध्ये ती पोलिस अधिका-यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: raveena tandon posts proof video after people ask if she really worked on her farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.