Lockdown : कुमारस्वामी पुत्राच्या शाही लग्नावर रवीना टंडनचे ट्विट, वाचा काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 04:56 PM2020-04-17T16:56:32+5:302020-04-17T16:58:59+5:30

रवीना संतापली

raveena tandon reaction on karnataka former cm hd kumaraswamy son nikhil wedding amid coronavirus lockdown-ram | Lockdown : कुमारस्वामी पुत्राच्या शाही लग्नावर रवीना टंडनचे ट्विट, वाचा काय म्हणाली?

Lockdown : कुमारस्वामी पुत्राच्या शाही लग्नावर रवीना टंडनचे ट्विट, वाचा काय म्हणाली?

googlenewsNext
ठळक मुद्देरवीनाने या लग्नाबद्दलची एएनआयची रिट्विट करत आपला संताप बोलून दाखवला.

कोरोना संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. नागरिक आपआपल्या घरात कैद आहे. रस्त्यारस्त्यावर पोलिसांचा कडक पहारा आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणा-यांना दंडुक्यांचा प्रसाद पडतोय. लोकांना अधिकाधिक सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. पण यादरम्यान एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. ती सुद्धा सामान्य लग्न नाही तर एक व्हिआयपी लग्न. होय, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा चिरंजीव आणि अभिनेता निखिल विवाहबंधनात अडकला. ते सुद्धा अगदी थाटामाटात. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्येच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचेही चित्र आहे.  नेटक-यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात अभिनेत्री रवीना टंडन ही सुद्धा मागे नाही.

रवीनाने या लग्नाबद्दलची एएनआयची रिट्विट करत आपला संताप बोलून दाखवला. ‘  या बिचा-यांना कदाचित माहित नाही की, या देशात असंख्य लोक आपल्या घरी आपल्या कुटुंबाजवळ जाऊ शकत नाहीयेत. असंख्य लोक भुकेले आहेत. तर उर्वरित लोक या कठिणप्रसंगी गरजूंची मदत करण्याचे प्रयत्न करत आहेत. बुफेमध्ये काय काय वाढले गेले होते, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे,’ असे उपरोधिक ट्विट रवीनाने या लग्नाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.


 
शुक्रवार 17 एप्रिलच्या मुहूर्तावर निखिलचे लग्न रेवतीसोबत करण्याचे आधीपासूनच ठरले होते. त्यानुसार या ठरलेल्या मुहूर्तावर निखील व रेवतीचा शाही विवाहसोहळा झाला. रेवती ही कर्नाटकचे माजी गृहनिर्माणमंत्री एम. कृष्णाप्पा यांची नात आहे.  

Web Title: raveena tandon reaction on karnataka former cm hd kumaraswamy son nikhil wedding amid coronavirus lockdown-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.