९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. रवीनाची लेक राशा थडानीनेही आता नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिचा 'आझाद' सिनेमा रिलीज झाला आहे. पण रवीनाला फक्त राशाच नाही तर आणखी दोन मुली आहेत. रवीनाने वयाच्या २१ व्या वर्षीच दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यांचं तिने लग्नही लावून दिलं. त्यातल्या एकीचा आंतरधर्मीय विवाह होता. याचीच गोष्ट रवीनाने एका मुलाखतीत सांगितली होती.
रवीना टंडनने २००४ साली बिझनेसमन अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली. त्याआधीच तिने वयाच्या २१ व्या वर्षीच दोन मुलींची जबाबदारी घेतली होती. छाया आणि पूजा अशी त्यांची नावं आहेत. या दोघीही रवीनाच्या एका कजिनच्या मुली आहेत. कजिनच्या निधनानंतर तिने त्यांची जबाबदारी घेतली होती. रवीनाची लेक छायाने आंतरधर्मीय विवाह केला. रवीनानेच हे लग्न लावून दिलं. याविषयी ती म्हणाली, "माझ्या लेकीचा आंतरधर्मीय विवाह झाला होता. मी खूप आनंदी होते. आम्ही छायाची चूडा सेरेमनी केली. गाऊनसोबतच तिला चूडा घातला. त्यांनी चर्चमध्ये वचन घेतल्यानंतर तिथेच तिला मंगळसूत्रही घातलं. चर्चेमध्येच तिच्या भांगेत सिंदूरही भरलं. तिच्या लग्नात दोन्ही धर्म एकत्र झाले होते."
माझं माझ्या लेकींसोबत आयुष्यभराचं नातं आहे. ही लाईफटाईम कमिटमेंट आहे. आमच्या नात्यात प्रेम, भावना आहे. अनिललाही आधीपासून माझ्या लेकींबद्दल माहित होतं. तेच त्या दोघींना आर्थिक आणि इतर सल्लेही द्यायचे आणि अजूनही देतात."
अनिल थडानीशी लग्न केल्यानंतर रवीनाने २००५ साली राशा जन्म दिला. तर २००८ साली तिला मुलगा झाला ज्याचं नाव रणबीरवर्धन आहे.