बॉलिवूडमध्ये सध्या कलाकारांपेक्षा जास्त 'स्टारकीड्स'चीच चर्चा असते. सुहाना खान, अनन्या पांडे, सारा अली खान, पलक तिवारी, इब्राहिम अली खान, खुशी कपूर या स्टारकीड्सने तर बॉलिवूडमध्ये एन्ट्रीही घेतली आहे. आता सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे रवीना टंडनची (Raveena Tandon) लेक राशा थडानीने (Rasha Thadani) . शिवाय या स्टारकीड्सच्या अफेअरच्याही चर्चा जोर धरुन आहेतच. सध्या राशा अरबाज खानचा मुलगा अरहानला (Arhaan Khan) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
एकीकडे पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानच्या अफेअरची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक स्टारकीड कपल नावारुपाला येतंय. अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नात रवीना टंडन तिच्या लेकीसह पोहचली होती. यावेळी अरबाज आणि रवीना डान्सही व्हायरल झाला. आता त्या दिवसानंतर अरबाज खानचा मुलगा अरहान खान आणि राशा थडानी एकत्र दिसत आहेत. दोघांमध्ये काही शिजतंय का की ते कुठल्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत यावर मात्र काहीच स्पष्ट झालेलं नाही. नुकतंच दोघांचा एकत्र कारमध्ये बसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
युझर्स हा व्हिडिओ जोरदार व्हायरल करत आहेत. तसंच राशा आणि अरहानची जोडी अनेकांना आवडलीही आहे. दोघंही सोबत चांगले दिसतात, छान केमिस्ट्री आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आता यात काय खरं काय खोटं हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सने धुमाकूळ घातला आहे हे खरंय.