ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे....

By अमित इंगोले | Published: September 22, 2020 03:27 PM2020-09-22T15:27:29+5:302020-09-22T15:28:12+5:30

रविना टंडनने पोस्टमध्ये लिहिले की, 'आता सफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत होईल. इथून सुरूवात करा त्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळा.

Raveena Tandon social media post says punish the guilty dealers suppliers | ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे....

ड्रग्स केसमध्ये दीपिकासह मोठ्या स्टार्सची नावे, रविना म्हणाली - सफाईची वेळ आली आहे....

googlenewsNext

सध्या एनसीबी करत असलेल्या ड्रग्स केसमधून रोज बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. दीपिका पादुकोणपासून ते सारा अली खानचंही नाव ड्रग्स केसमध्ये आलं आहे. या प्रकरणावर अभिनेत्री रविना टंडनने आपलं मत व्यक्त केलंय. आपला राग व्यक्त करत रविना म्हणाली की, दोषींना शिक्षा मिळावी.

रविना टंडनने पोस्टमध्ये लिहिले की, 'आता सफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत होईल. इथून सुरूवात करा त्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळा. मुळापासून उखडून फेका. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्सना शिक्षा द्या. फायदा घेणारे मोठे लोक निशाण्यावर आहेत. जे दुसऱ्यांकडे बघतही नाही आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात'. रविनाची ही पोस्ट ना कुणाच्या समर्थनात आहे ना कुणाच्या विरोधात आहे. तिने न्यूट्रल राहून समोर येत असलेल्या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलंय. 

दरम्यान, सध्या ड्रग्स प्रकरणामुळे बॉलिवूड चर्चेत आहे. फिल्म इंडस्ट्रीतून अनेक मोठी नावे समोर आल्यानंतर लोक बॉलिवूडमधील सगळ्याच लोकांकडे संशयाच्या नजरेने बघू लागले आहेत. मात्र, जया बच्चन, तापसी पन्नू, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, मनोज वाजपेयीसहीत अनेक कलाकार ड्रग्स मुद्द्याला विरोध करत म्हणाले की, बॉलिवूडमध्ये सगळेच ड्रग्स घेत नाहीत. तर काही सेलिब्रिटींचं मत आहे की, बॉलिवूडमधील अर्ध्या लोकांना नशेची सवय आहे.

रियाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ८ सप्टेंबरला अटक केली. त्यानंतर २२ सप्टेंबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यादरम्यान रिया आणि शौविकने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्याच्यावर उद्या म्हणजे २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग्स खरेदी केल्याचा आरोपाखाली अटक केली होती. सुरूवातीला रियाने ड्रग्स घेतले असल्याचे नाकारले होते पण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीत रियाचा भाऊ शौविकने ही बाब कबूल केली की रियाची गौरवसोबत केलेले चॅट योग्य आहे आणि तो स्वतः सुशांतसाठी ड्रग्स अरेंज करत होता ज्यासाठी पैसे त्याची बहिण रिया चक्रवर्ती देत होती.

हे पण वाचा :

Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! 

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

Web Title: Raveena Tandon social media post says punish the guilty dealers suppliers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.