Join us

Raveena Tandon : “त्याला आता भेटते तेव्हा...”, अक्षय कुमारसोबतच्या मोडलेल्या साखरपुड्यावर अनेक वर्षानंतर बोलली रवीना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 12:37 PM

Raveena Tandon, Akshay Kumar : असं म्हणतात की, अक्षय व रवीनानं गुपचूप साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. क्षणात सगळं संपलं. आता अनेक वर्षानंतर रवीना यावर बोलली आहे.

नव्वदीचं दशक गाजवणारी बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडननं (Raveena Tandon) एक काळ गाजवला. एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल लाईफमधील लव्ह अफेअर्सची चर्चाही खूप झाली. बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकहाण्यांचा अंत दु:खद झाला. रवीना आणि अक्षय कुमार ( Akshay Kumar ) यांची प्रेमकहाणी अशीच एक प्रेमकहाणी.

 90 च्या दशकात ‘मोहरा’ या चित्रपटात अक्षय व रवीनाची वर्णी लागली. शूटींग सुरू झालं आणि तशी दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली. दोघेही एकमेकांसोबत दिसू लागले. रवीना अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अगदी एका पायावर अक्कीशी लग्न करायला तयार होती. त्याच्यासाठी पीक वर असलेलं करिअर सोडायलाही राजी होती. अगदी तिनं सिनेमे साईन करणंही थांबवलं होतं. कारण लग्नानंतर रवीनानं काम करू नये, अशी अक्षयची इच्छा होती. असं म्हणतात की, अक्षय व रवीनानं गुपचूप साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. क्षणात सगळं संपलं. आता अनेक वर्षानंतर रवीना यावर बोलली आहे. 'एएनआई' पॉडकास्ट शोमध्ये ती अक्षय व तिच्या अफेअरबद्दल बिनधास्त बोलली.

अक्षयच्या आयुष्यातून निघाल्यावर...अक्षय व माझ्या अफेअरबद्दल आजही गुगलवर चिक्कार गोष्टी दिसतात. अशा अशा गोष्टी की, जणू माझ्या व अक्षयच्या साखरपुड्यात सामील असलेल्या लोकांमध्ये युद्ध झालं होतं. हॅलो, मी सांगू इच्छिते की, अक्षयच्या आयुष्यातून बाहेर पडल्यावर मी दुसऱ्या कुणाला डेट करत होते आणि तो सुद्धा दुसरीच्या प्रेमात होता. मग कसला आला द्वेष, कसला आला राग, कसला आला मत्सर असं रवीना म्हणाली.

यात कोणती मोठी गोष्ट होती..माझा कधीकाळी अक्षय कुमारसोबत साखरपुडा झाला होता, हे मी पूर्णपणे विसरले आहे. हे नातं संपल्यानंतर या प्रकरणातून, या प्रकरणाबद्दल मीडियात येणाऱ्या बातम्यांपासून मी स्वत:ला लांब ठेवलं होतं. त्यामुळे अक्षयसोबत कधी साखरपुडा झाला होता, हेही आता मला आठवत नाही. मी यातून बाहेर पडलेय, पण लोक आजही त्याच जुन्या गोष्टी का उगाळतात, हेच मला कळत नाही. लोक घटस्फोटानंतर मुव्ह ऑन करतात, यात काय विशेष..., असंही ती म्हणाली.

अक्षयला आता भेटते तेव्हा..मोहरा या चित्रपटादरम्यान आमची जोडी हिट झाली होती. आत्ताही आम्ही कधीमधी पब्लिकली भेटतो तेव्हा आनंदाने एकमेकांना भेटतो, बोलतो. प्रत्येकजण आयुष्यात पुढे गेला आहे. मुली कॉलेजात दर आठवड्याला बॉयफ्रेन्ड बदलतात. पण माझा एक मोडलेला साखरपुडा आजही लोकांच्या डोक्यात अटकला आहे. प्रत्येकजण मुव्ह ऑन करतो. साखरपुड्यानंतर मी मुव्ह ऑन केलं, त्यात कोणती मोठी गोष्ट आहे, असंही ती म्हणाली.

टॅग्स :रवीना टंडनअक्षय कुमारबॉलिवूड