Join us

लालसेपोटी रवीना टंडन पार करणार प्रत्येक मर्यादा; 'कर्मा कॉलिंग'चा दमदार टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 6:01 PM

रवीना टंडनची आगामी सीरिज 'कर्मा कॉलिंग'चा टीझर रिलीज झाला आहे.

'टिप टिप बरसा पानी' या गाण्यातून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीना सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच रवीना टंडनची आगामी सीरिज 'कर्मा कॉलिंग'चा टीझर रिलीज झाला आहे.  टीझरमध्ये रवीनाची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळत आहे. 

रुची नारायण दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये रवीना ही इंद्राणी कोठारी या व्यक्तिरेखेची भूमिका साकारताना दिसणार आहे. कर्मा कॉलिंगची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ही सीरिज  26 जानेवारी 2024 रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.  ही वेबसीरिज 'रिव्हेंज' या अमेरिकन वेबसिरीजवर आधारित आहे. जी 2011-2015 दरम्यान प्रसारित झाली होती.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल' सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'वेलकम' फ्रँचायझीच्या या तिसऱ्या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी आणि परेश रावल देखील दिसणार आहेत.  अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढील वर्षी २ डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून बऱ्याच वर्षांनी अक्षय-रवीनाची जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल.

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसेलिब्रिटी