Join us

रविना टंडनला करायचं होतं गोविंदाशी लग्न? अभिनेत्याच्या पत्नीने केली पोलखोल, म्हणाली- "ती मला भेटल्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:06 IST

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने अभिनेत्याबद्दल मजेशीर खुलासे केलेत

गोविंदा हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेता. गोविंदाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. गोविंदाच्या भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलंय तर काही भूमिकांनी प्रेक्षकांना भावुक केलंय. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाही सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागल्याने मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये पत्नी सुनिताचं नाव घेऊन थट्टामस्करी केली होती. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने रविना टंडनचं नाव घेऊन एक गंमतीशीर खुलासा केलाय.

गोविंदाची पत्नी नेमकं काय म्हणाली

गोविंदाच्या पत्नीने दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीय. गोविंदाच्या सहकलाकारांनी त्याच्यासोबत कधी फ्लर्ट केलंय का? असा प्रश्न विचारला असता सुनीता म्हणाली की, "रविना टंडन अजूनही बोलते की,  चीची (गोविंदा) जर मला आधी भेटला असता तर मी त्याच्याशी लग्न केलं असतं. त्यावर मी रविनाला म्हणते की, घेऊन जा त्याला. तुला कळेल मग." अशाप्रकारे सुनीताने गंमतीशीर खुलासा केला.

गोविंदाला गोळी लागल्यावर सुनिता काय म्हणाली?

झालं असं की, कपिल शर्मा शोमध्ये गोविंदाने आणखी एक किस्सा सांगितला होता. सुनिता बाहेर गेली तर तुला गोळी कोणी मारली? असा गंमतीशीर प्रश्न अभिनेत्री शिल्पा शेट्टीने गोविंदाला हॉस्पिटलमध्ये विचारला होता. त्यावेळी सुनिताही तिथेच उपस्थित होती. ती म्हणाली की, "मी जर घरी असते तर गोविंदाच्या पायावर नव्हे तर छातीवरच गोळी झाडली असती. काम करायचं तर पूर्ण करायचं." अशाप्रकारे सुनिताने मुलाखतीत मजेशीर खुलासे केले.

टॅग्स :गोविंदाबॉलिवूड