Join us  

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी इटलीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 5:12 PM

Rasha Thadani : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन(Raveena Tandon)ची मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगण(Ajay Devgan)चा भाचा अमन देवगण(Aman Devgan)सोबत झळकताना दिसणार आहे. सध्या राशाची काही फोटो इंटरनेटवर खळबळ माजवत आहेत. रवीना अनेकदा आपल्या मुलीसोबत टूरवर जाते. सध्या ती इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

सध्या रवीना टंडन तिच्या मुलांसोबत इटलीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, तिची मुलगी राशा देखील व्हॅकेशनमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे, ज्यामध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये राशा पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली दिसली.

राशाच्या या किलर लूकवर चाहते फिदा झाले आहेत. तिने शेअर केलेले फोटो तिच्या संपूर्ण व्हॅकेशनची झलक दाखवते. इतर काही फोटोंमध्ये ती पाण्यात पोहताना आणि मजा घेताना दिसत आहे. फोटोंमध्ये राशा निसर्गाचा आनंद लुटताना सूर्यस्नान करताना दिसली. तिच्या ड्रेससोबतच पांढऱ्या रंगाचा चष्मा तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. राशाचे हे फोटो पाहून लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. एका यूजरने कमेंट केली की, 'आता पर्वतांमध्येही असे सौंदर्य नाही.' दुसऱ्या यूजरने कमेंट केली- 'नेहमीप्रमाणेच सुंदर, सुंदर राणी. सुंदर सुंदर राजकुमारी. आणखी एका युजरने 'किती सुंदरता आहे' अशी कमेंट केली.

या चित्रपटातून करणार पदार्पणराशा लवकरच अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगणसोबत एका अॅडव्हेंचर चित्रपटात दिसणार आहे. केदारनाथ आणि रॉक ऑन सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना राशाने सांगितले की, तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिचे ऑडिशन चांगले झाले नाही. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. प्रज्ञा कपूर आणि रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करत आहेत.

टॅग्स :रवीना टंडन