अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते आहेत. विराट-अनुष्काला वामिका आणि अकाय ही दोन मुले आहेत. २०२१मध्ये अनुष्काने त्यांच्या पहिला लेकीला वामिकाला जन्म दिला. तर २०२४मध्ये विरुष्काला पुत्ररत्न झालं. आपल्या दोन्ही मुलांना विरुष्काने पापाराझी आणि मीडियापासून दूरच ठेवलं आहे. वामिका आणि अकाय कसे दिसतात, याबाबत त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
विरुष्काचा लेक अकाय कसा दिसतो? याबाबत RCB च्या क्रिकेटरच्या पत्नीने खुलासा केला आहे. भारतीय क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये RCB कडून खेळणारा नवदीप सैनीची पत्नी स्वाती ही अकायला भेटली. स्वाती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओतून अकाय कोणासारखा दिसतो, हे सांगितलं आहे. स्वाती सैनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत ती म्हणते, "आज मी अनुष्काला भेटले आणि तिच्या छोटू अकायलाही भेटले. तो खूपच क्यूट आहे. अनुष्कासारखाच तो दिसतो. तो गोलू गोबुछा आहे". अनुष्काने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अकायला जन्म दिला. यावर्षी अकाय एक वर्षाचा होईल. तर विरुष्काच्या वामिकाचा ११ जानेवारीला वाढदिवस आहे. ती ३ वर्षांची आहे.