Join us

'भूल भूलैय्या ३'मध्ये जुन्या कॅरेक्टरची पुन्हा एन्ट्री? कार्तिक आर्यनच्या तोंडून नकळत निघालं हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 11:27 IST

'भूल भूलैय्या ३'मध्ये आधीच्या भागातलं गाजलेलं हे कॅरेक्टर पुन्हा दिसणार आहे (bhool bulaiyya 3, kartik aryan)

सध्या कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाल्यापासून कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित 'भूल भूलैय्या ३'मध्ये काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 'भूल भूलैय्या ३'मध्ये मंजुलिका परत येत असल्याने हटके कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात शंका नाही. अशातच 'भूल भूलैय्या ३'मध्ये आधीच्या भागातलं एक कॅरेक्टर पुन्हा एन्ट्री घेताना दिसणार आहे. कोण आहे ते कॅरेक्टर? जाणून घ्या

'भूल भूलैय्या ३'मध्ये दिसणार ही जुनी व्यक्तिरेखा

कार्तिक आर्यनने मीडियाशी संवाद साधताना नकळतपणे एक नाव घेतलं. कार्तिक म्हणाला, "भूल भूलैय्या ३ चे दोन क्लायमॅक्स होते. त्यापैकी आम्हाला फक्त एका क्लायमॅक्सची स्क्रीप्ट देण्यात आली होती. स्क्रीप्टमधली शेवटची १५ पानं गायब होती. केवळ आमच्याकडेच नाही तर सिनेमाचे असिस्टंट डायरेक्टर, प्रॉडक्शन डिपार्टमेंट सर्वांकडे अशीच स्क्रीप्ट गेली होती. इतकंच नव्हे तर आम्ही कियारासोबत शूट करत होतो." असं म्हणताच कार्तिक गडबडला आणि त्याने लगेच कियाराचं नाव बदलून विद्या बालनचं नाव घेतलं. अशाप्रकारे कार्तिकने नंतर त्याचं बोलणं सावरलं असलं तरीही 'भूल भूलैय्या ३'मध्ये कियारा अडवाणी दिसणार असल्याची शक्यता आहे. कियाराने कार्तिकसोबत 'भूल भूलैय्या २'मध्ये काम केलं होतं.

'भूल भूलैय्या ३' कधी होणार रिलीज?

'भूल भूलैय्या ३' दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. २००७ साली आलेल्या 'भूल भुलैय्या'चा हा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं आहे तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता कियारा अडवाणी तिसऱ्या भागात दिसणार का हे सिनेमा आल्यावरच कळेल.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्याकियारा अडवाणीविद्या बालन