वाचा, ‘कॉपी’च्या आरोपावर ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 5:58 AM
भारताकडून आॅस्करसाठी पाठविण्यात आलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाबद्दलची एक वेगळीच चर्चा सध्या रंगतेय. काल आम्ही याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला दिली ...
भारताकडून आॅस्करसाठी पाठविण्यात आलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाबद्दलची एक वेगळीच चर्चा सध्या रंगतेय. काल आम्ही याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला दिली होतीच. हा चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ या इराणी चित्रपटाच्या कथेवर बेतलेला असल्याचा म्हणजेच एकार्थाने ‘न्यूटन’ हा या इराणी चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप होत आहे. तूर्तास या बातमीमुळे सध्या खळबळ माजली आहे. ‘न्यूटन’च्या कंटेंटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने, भारताकडून आॅस्करसाठी करण्यात आलेल्या दावेदारीवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशात ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर चुप्पी तोडत खुलासा केला आहे. ‘न्यूटन’ इराणी चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ची कॉपी असल्याचा आरोप त्यांनी धुडकावून लावला आहे. आमचा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोहात गेलायं. याठिकाणी आम्ही अनेक पुरस्कार जिंकलेत. हा चित्रपट कॉपी असता तर आम्हाला इतके पुरस्कार मिळाले असते का? असा सवाल मसूरकर यांनी केला आहे. भारतात रिलीज झाल्यावर ‘न्यूटन’वर आरोप होऊ लागले. मला ‘सीक्रेट बॅलेट’बद्दल काहीही ठाऊक नव्हते. गँगस्टर चित्रपटात नेहमी कुटुंबातील कुणाचा तरी मृत्यू होतो. यानंतर चित्रपटाची कथा पुढे सरकते. प्रत्येक चित्रपटात एक प्रामाणिक अधिकारी असतो. माझ्या चित्रपटातही अशाच एका प्रामाणिक कर्मचाºयाची कथा आहे. माझा चित्रपट छत्तीसगडवर बेस्ट आहे. मी या कथेवर काम करत होतो तेव्हा ‘सीक्रेट बॅलेट’चे नावही मी ऐकले नव्हते. माझा चित्रपट ‘सीक्रेट बॅलेट’ची कॉपी असल्याचे आरोप होऊ लागलेत, तेव्हा कुठे मी हा चित्रपट बघितला. ‘न्यूटन’ कोणत्याही चित्रपटाची कॉपी असता तर बर्लिन, ट्रिबेकामध्ये तो दाखविण्याची संधी आम्हाला मिळाली असती का? आमचा चित्रपट कोणत्याही चित्रपटाची कॉपी नाही तसेच, तो कोणापासून प्रेरितसुद्धा नाही असे मसूरकर यांनी स्पष्ट केले.‘सीक्रेट बॅलेट’ या चित्रपटाला बाबाक पयामी नेने यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. ‘न्यूटन’ आणि या चित्रपटाच्या कथेच बºयाच अंशी साम्य आहे. ALSO READ : ‘या’ इराणी चित्रपटाचा कॉपी आहे राजकुमार रावचा ‘न्यूटन’, सांगा कसा मिळेल आॅस्कर?‘न्यूटन’ हा छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणा-या एका कर्मचाºयाची कहाणी आहे. राजकुमार रावने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे.