सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी(Vikrant Messey)चे सर्वत्र कौतुक होत आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या '१२ वीं फेल' (12th Fail) या चित्रपटात आयपीएस मनोज कुमारची भूमिका साकारून तो लोकप्रिय झाला आहे. यासाठी त्याला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार मिळाला. पण या व्यक्तिरेखेसाठी विक्रांत मेस्सीला किती मेहनत घ्यावी लागली हे तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाच्या कथेमुळे तो खूप भावनिक झाला होता की तो रडतच राहिला. अश्रू आवरणे कठीण झाले होते.
'१२ वीं फेल' हा चित्रपट बिहारचे रहिवासी IPS मनोज कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. मनोज कुमार यांनी लहानपणापासून तारुण्यापर्यंत खूप गरिबी पाहिली आणि खूप संघर्ष केला. त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. जेव्हा विक्रांतला त्याची कथा समजली आणि '१२ वीं फेल'ची स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
विक्रांतने सांगितला इमोशनल किस्सा विक्रांत मेस्सीने काही काळापूर्वी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा तो १५-२० मिनिटे रडत होता. विक्रांतने सांगितले की, त्याने अशी कथा कुठेही वाचली नाही किंवा पाहिली नाही. विक्रांतने सांगितले की, या कथेत त्याने स्वतःला पाहिले आणि तो रडू लागला.
'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसणार विक्रांत मेस्सी '१२ वीं फेल' २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात मेधा शंकर त्यांची पत्नी आणि IRS अधिकारी श्रद्धा यांच्या भूमिकेत दिसली होती. २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या '१२वीं फेल'ने जवळपास ६६ कोटींची कमाई केली होती. २९ डिसेंबरला जेव्हा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला तेव्हा सगळेच त्याचे चाहते झाले. विक्रांत मेस्सी आता एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात दिसणार आहे