वाचा,कपिल शर्माच्या मानसिक स्थितीबद्दल काय बोलली एक्स- गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस !!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2018 5:26 AM
कपिल शर्मा पुन्हा चर्चेत आलाय. काल शनिवारी सलमान खानच्या शिक्षेसंदर्भाने प्रसार माध्यमांना शिवीगाळ करणारे ट्वीट आक्षेपार्ह करून कपिल फसला. (अर्थात ...
कपिल शर्मा पुन्हा चर्चेत आलाय. काल शनिवारी सलमान खानच्या शिक्षेसंदर्भाने प्रसार माध्यमांना शिवीगाळ करणारे ट्वीट आक्षेपार्ह करून कपिल फसला. (अर्थात थोड्याच वेळात त्याने हे आक्षेपार्ह ट्वीट डिलिट केलेत. पण तोपर्यंत ते व्हायरल झाले होते.) यानंतरच्या काही तासात कपिलने त्याची एक्स गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस आणि एका संकेतस्थळाच्या संपादकाविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केला. आपल्या तक्रारीत कपिलने प्रिती सिमोस आणि तिची बहीण निती या दोघींवर प्रत्येकी २५ लाख रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. शिवाय संबंधित संपादकावरही २५ लाखांची मागणी केल्याचा व ती पूर्ण न केल्याने डिजिटल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेतच. पण त्याआधी कपिलची एक्स गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोसने कपिलबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ALSO READ : कपिल शर्माने एक्स गर्लफ्रेंड आणि पत्रकाराविरोधात दाखल केली तक्रार होय, कपिलने काल जे काही आक्षेपार्ह टिष्ट्वट केलेत, ते कपिलने नाही तर दुसºयाच कुणी केले असावेत, असा संशय तिने बोलून दाखवला. कपिल एक हुशार व्यक्ती आहे. तो असे काही करेल, असे मला वाटत नाही. मला संशय आहे की, त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चत्रार्थ वा अन्य कुणी त्याच्या फोनवरून हे सगळे करत असावे. या सगळ्यामागे कपिल नसावा, अशी मी आशा करते. पण या सगळ्यामागे गिन्नी नसून कपिल स्वत:च असेल तर मला त्याच्या मानसिक स्थितीबद्दल काळजी वाटू लागलीय. गेल्या काही महिन्यांपासून त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. यादरम्यान मी अनेकदा त्याच्याशी बोलले. त्याला भेटलेही. या भेटीत कपिल पुरता बदलल्याचे मला जाणवते. वर्षभरापूर्वी तो जसा होता, तसा नाहीये. तो बदलला आहे. हा केवळ तणाव नाही. बायपोलर किंवा सिजोफ्रेनिया असे काहीही हे असू शकते. त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही येत आहे. त्याचा चेहरा बदललायं. डोळे बदललेत. बोलता बोलता तो अचानक विषय बदलतो. जो कुणी कपिलसोबत असे काही करत असेल तर मी त्याला मनापासून सांगू इच्छिते की, त्याला सोडा, त्याला जगू द्या. त्याना रिहॅब सेंटरमध्ये घेऊन जा. यास्थिीत कपिलच्या हातून काही वाईट घडले तर एका चांगला व्यक्ती आपण गमावून,असे ती म्हणाली.