Join us

'शिकारा'च्या निर्मात्यांनी काश्मिरी पंडितांसाठी केली ही गोष्ट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 6:09 PM

'शिकारा' हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

 काश्मिरी पंडितांना त्यांच्या राहत्या घरातून हुसकावून काढले गेले त्या दुर्दैवी दिवसाला नुकतीच ३० वर्ष पूर्ण झाली. या दिवशी 'शिकारा'च्या निर्मात्यांनी काश्मिरी पंडितांसाठी एका विशेष शोचे आयोजन केले होते. या विशेष शो साठी जवळपास २०० लोक जम्मू येथील शरणार्थी शिबिरातून आले होते.

शिकारा या चित्रपटात त्यावेळच्या इतिहासातील दाहकता आणि वास्तविकता जपण्यासाठी, ३० वर्षांपूर्वीचे वास्तविक फुटेज वापरण्यात आले आहेत.  ४ हजार खऱ्याखुऱ्या कश्मीरी पंडितांना चित्रित करण्यात आले आहे.

१९९० मधील काश्मीरचे शक्तिशाली चित्रण विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या या चित्रपटात केले आहे.

३० वर्षांपूर्वी ज्यांना आपल्या राहत्या घरातून हुसकावण्यात आले होते आणि जे आपल्याच देशात शरणार्थ्यांप्रमाणे राहात आहेत अशांसाठी या चित्रपटाचा हा शो एक भावनिक सोहळा होता. या शोनंतर लोकांसोबत संवाद साधताना विधु विनोद चोप्रा यांना या चित्रपटाविषयी जबरदस्त भावनिक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 

विधु विनोद चोप्रा यांचा 'शिकारा' हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होत असून हा चित्रपट विनोद चोप्रा प्रोडक्शन निर्मित आणि फॉक्स स्टार स्टूडियोद्वारा सह निर्मित आहे.

टॅग्स :शिकारा