Join us

Real Hero ! प्रवासी मजूरांसाठी सोनू सूद उतरला रस्त्यावर, म्हणाला - 'ACत बसून ट्विट करुन होणार नाही मजूरांचं भलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:59 PM

सोनू सूदचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

कोरोना व्हायरसच्या लढाईत प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर सोनू सूदने प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसची सोय केली आहे. इतकंच नाही तर खुद्द सोनू सूद त्यांना निरोप द्यायला गेला होता. सोनू सूदने यावेळी बऱ्याच बसेसची सोय केली आहे.

याबद्दल सोनू सूद म्हणाला की, मला विश्वास आहे की वर्तमान काळात आपण सगळे वैश्विक स्वास्थ आपत्तीला सामोरे जात आहोत. प्रत्येक भारतीय कुटुंब व जवळच्या व्यक्तींसोबत राहिले पाहिजे. मी महाराष्ट्र व कर्नाटक सरकारकडून या प्रवाशांच्या घर वापसीसाठी जवळपास दहा बसेसची परवानगी घेतली होती.

सोनू सूदने पुढे सांगितले की माझे कर्तव्य आहे की त्यांना मदत करणे कारण हे प्रवासी आपल्या देशाच्या हृदयाची धडकन आहेत. आपण या प्रवाशांना त्याच्या कुटुंब व मुलांसोबत रस्त्यांवर चालताना पाहिलंय. आपण फक्त एसीत बसून ट्विट करू शकत नाही आणि जोपर्यंत रस्त्यावर जात नाही तोपर्यंत आपल्याला वाटणारी चिंता दाखवू शकत नाही. जोपर्यंत आपण त्यांच्यातील एक बनत नाही. तोपर्यंत त्यांना विश्वास बसणार नाही की आपल्या मदतीसाठी कुणीतरी आहे.

सोनू पुढे म्हणाला की, आता मला खूप मेल व मेसेज दररोज येतात की ज्यात लोक सांगतात की त्यांना प्रवास करायचा आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. या लॉकडाउनमध्ये माझे हे एकच काम आहे. मला इतके समाधान वाटतंय जे मी शब्दांत सांगू शकत नाही.

त्याने सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी खूप मदत केली. विशेष म्हणजे कागदावरील कारवाईचे आयोजन करण्यात आणि कर्नाटक सरकारने तिथल्या मजूरांना परत आणण्यासाठी मदत केली आहे. मला लहान मुले, वयस्कर व्यक्ती आई वडीलांसोबत रस्त्यांवर चालताना पाहून खूप दुःख होत होते. माझ्या क्षमतेनुसार मी इतर राज्यांसाठीदेखील असे करत राहीन.

त्याने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, एका मजूराच्या चेहऱ्यावरील आनंदामुळे त्याचा दिवस बनला.

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्या