'छपाक' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे वादाच्या भोव-यात अडकत गेला. सिनेमा प्रदर्शनापूर्वीच फिल्ममेकर्सवर स्क्रीप्ट चोरी केल्याचाही आरोप करण्यात आला. सिनेमाचा प्रोमो प्रदर्शित होताच छपाक सिनेमाची स्टोरी राकेश भारती यांच्या स्क्रीप्टशी मिळती जुळती असल्याचा दावा करण्यात आला. 2015 मध्येच 'ब्लॅक डे' नावाने स्क्रीप्टचे राइटर एसोशिएसनकडे राकेश यांनी रजिस्ट्रेशन केले असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र 2017 मध्ये माहिती मिळाली की, मेघना गुलजार हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. इतकेच नाही तर राकेश यांनी सिनेमासाठी ऐश्वर्या राय बच्चन, कंगना रनौत, श्रद्धा कपूर, प्रियंका चोपड़ा आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे त्यांनी विचारणार केली होती.
प्रियंका चोपडा त्यावेळी भारतात नव्हती, त्यामुळे सिनेमा करण्यासा पुरेसा वेळ तिच्याकडे नसल्यामुळे तिने नाही म्हटले. कंगणाची बहिण रंगोली अॅसिड पीडिता असल्यामुळे कंगणासाठी हा इमोशल ठरू शकतो त्यामुळे तिनेही नकार दिला. अनुष्का शर्माकडे दोन वर्ष सिनेमासाठी तारखा नव्हत्या त्यामुळे तिनेही नकार कळवला. श्रद्धा कपूरने या वयात अशा भूमिका तिला करायचे नसल्याचे म्हटले तर ऐश्वर्यानेही रूपेरी पडद्यावर कुरूप दिसायचे नसल्याचे कारण देत