46 वर्षीय सुष्मिता सेनची (Sushmita Sen) जादू आजही कमी झालेली नाही. घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा अदा आणि अभिनय यामुळे सुष्मितानं अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नंबरची अभिनेत्री हे स्थान मिळवलं होतं. रुपेरी पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर आता ओटीटी वेबसिरीज मधून रसिकांचे मनोरंजन करत आहे.चित्रपट आणि वेबसीरिजमधून तिने खूप कमाई केली आहे. वयाच्या १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी सुष्मिता करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.
सुष्मिता सेनने 1996 मध्ये 'दस्तक' चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सुष्मिताने राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले फॅन फॉलोइंग निर्माण केले आहे. आज जगाच्या कानाकोपर्यात तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
सुष्मिता चित्रपटांनंतर ओटीटीवरील तिच्या 'आर्या' या वेब सीरिजमुळे खूप चर्चेत आहे. इतकी वर्षे सातत्याने काम करणाऱ्या या अभिनेत्रीने साहजिकच चांगली संपत्ती कमावली असेल. एका वेबसाइटनुसार, सुष्मिता सेनची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या 2021 च्या आकडेवारीनुसार, सुष्मिता सेनचे दरमहा सुमारे 60 लाख रुपये उत्पन्न आहे.सुष्मिता सेन तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय त्याने मॉडेलिंगमधूनही भरपूर कमाई केली आहे. चित्रपट आणि वेबसिरीज व्यतिरिक्त, सुष्मिता सेनच्या कमाईचा एक मोठे माध्यम म्हणजे ब्रँड प्रमोशन.सुष्मिता सेन जाहिरातीतून सुमारे 1.5 कोटी रुपये कमावते. या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये अभिनेत्रीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे सुष्मिता सेन सध्या खूप चर्चेत आहे.
दोघांच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. शॉपिंग असो, इव्हेंट्स असो किंवा व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र दिसायचे. सुष्मिता सेन आणि रोहमन यांचे ब्रेकअप झाले आहे.लग्नाबद्दल दोघांनीही कधीच स्पष्टीकरण दिले नव्हते. मध्यंतरी 'जेव्हा कधी लग्न होईल,तेव्हा ते लपून राहणार नाही. याबद्दल विचार झाल्यास नक्की सांगितलं जाईल'.असे रोहमनने सांगितले होते.