...तर या कारणामुळे हेमा मालिनी यांनी राजेश खन्नाला कधीही दिला नाही भाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 3:26 PM
राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांनी एकेकाळी बॉलिवूडवर राज केले होते. परंतु हेमा यांनी राजेश खन्ना यांना कधीही भाव दिला नसल्याचे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले.
ड्रिम गर्ल हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेता राजेश खन्ना बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशी नावे आहेत, ज्यांच्या अभिनयाचे चाहते आजही दिवाने आहेत. राजेश खन्ना यांच्या चार्मवर तर आजही चाहते फिदा आहेत. तर हेमा मालिनी यांनाही अजून ड्रिम गर्ल या नावानेच ओळखलेच जाते. या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या जमान्यात आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीवर राज केले. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की राजेश खन्ना हे हेमा मालिनी यांना गर्विष्ठ समजायचे? अखेर हा संपूर्ण मामला काय आहे याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...सर्वांनाच माहिती होते की, राजेश खन्ना नेहमीच सेटवर उशिरा येत असत. त्यांच्या या सवयीमुळे बरेचसे दिग्दर्शक आणि राजेश खन्नासोबत काम करणारे को-स्टार त्रस्त असायचे. हेमा मालिनी यांनादेखील राजेश खन्ना यांच्या या सवयीचा सामना करावा लागला. हा किस्सा राजेश खन्ना यांच्यासोबत हेमा मालिनी यांनी केलेल्या ‘अंदाज’ या पहिल्याच चित्रपटाप्रसंगीचा आहे. न्यूज वेबसाइट मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी राजेश खन्नासोबत असलेल्या आठवणींना उजाळा देताना याबाबतचा खुलासा केला. हेमा मालिनी यांनी सांगितले की, राजेश खन्ना ‘अंदाज’ या चित्रपटाच्या सेटवर नेहमीच उशिरा येत असत. बºयाचदा संपूर्ण युनिटला त्यांची ८ ते १० तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र अशातही कोणातही त्यांची तक्रार करण्यास हिंमत नव्हती. त्यावेळी भलेही त्यांच्या चार्मवर तरुणी फिदा असायच्या, परंतु मी त्यांना को-स्टार या नात्याने कधीही जास्त भाव दिला नाही. मी त्यांच्या या सवयीमुळे खूप त्रस्त होती. कदाचित यामुळेच राजेश खन्ना मला गर्विष्ठ समजायचे. परंतु खरं सांगायचे झाल्यास, ते त्यांच्याच दुनियेत रममाण असायचे, असेही हेमा यांनी सांगितले होते.