Join us

हार के बाद ही जीत है ! 19 वर्षापासून बॉलिवूडमधून गायब आहे ही अभिनेत्री, आज कमावते करोडो रूपये, उच्चपदावर करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:40 PM

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगोला अभिनयक्षेत्रात तितकेसे यश मिळवता आले नाही. पण तरीही एखाद्या अभिनेत्रीइतकेच महत्त्व आज तिला आहे.

स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमतं असे नाही. बॉलिवूडमध्ये अनेक उदाहरणं आहेत ज्यांचे करिअर फ्लॉप झाले तरीही दुस-या क्षेत्रात अव्वल काम करत आलिशान आयुष्य जगत आहेत. यामध्ये मयुरी कांगोचे नाव सर्वांत आधी घेतले जाते. 

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगोला अभिनयक्षेत्रात तितकेसे यश मिळवता आले नाही. पण तरीही एखाद्या अभिनेत्रीइतकेच महत्त्व आज तिला आहे. गुगल इंडियाची हेड म्हणून ती आज काम करते. मयुरीने महेश भट्टच्या 'पापा कहते है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मयुरी रातोरात प्रसिद्धीझोतात आली. तिने गेल्या काही महिन्यांपूर्वी दिलेल्या या मुलाखतीत म्हटले होते की, मी एकूण १६ सिनेमे केले होते पण त्यातले अर्ध्याहून अधिक प्रदर्शित झालेच नाही.

 १९९९ हे वर्ष फारसे काही चांगले नव्हते. मला सिनेमात झाडाच्या मागे पुढे डान्स करायला सांगायचे. जे मला अजिबात आवडायचे नाही. मग मी पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्ष केंद्रित करायला सुरूवात केली. नंतर २००० मध्ये मी टीव्हीकडे वळली आणि काही वर्षानंतर लग्न करून मी यूएसला शिफ्ट झाले. 

अभिनय सोडल्यानंतर न्यूयॉर्कमधील ३६० आय या डिजीटल एजन्सीमध्ये मयुरी नोकरी करू लागली. त्यानंतर त्याच कंपनीत तिला मीडिया मॅनेजर या पदावर बढती मिळाली आणि आता तर ती गुगल इंडियामध्ये कार्यरत आहे. मयुरीने केलेल्या चित्रपटांच्या यादीत 'होगी प्यार की जीत','पापा कहते है', 'जितेंगे हम' हे चित्रपट नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत.