बहिणीच्या पावलावर पाऊल टाकतं बी-टाऊनमध्ये एंट्री मारलेल्या परिणीती चोपडाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली होती. सुरूवातीपासून परिणीतीने आपल्या आवडीनुसारच भूमिका साकारल्या. भारंभार सिनेमा न करता निवडक सिनेमात झळकलेली परिणीतीने सुशांतसह काम करण्यासह नकार दिला होता. तिला एका टीव्ही अभिनेत्यासह सिनेमात काम करायचे नव्हते. म्हणून सुशांतचे नाव कळताच तिने क्षणाचाही विलंब न करता अनुरागला कश्यप 'हँसी तो फसी सिनेमासाठी' नकार दिला होता.
विशेष म्हणजे त्याचवेळी परिणीतीकडे यशराज फिल्म्सचा 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमाची ऑफरही होती. यशराज याच सिनेमासाठी सुशांतलाही ऑफर देण्याचे ठरवले होते.यशराजने सुशांतला 'हँसी तो फसी' सिनेमा करण्यापेक्षा 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमा करायसा सांगितला. त्यातच यशराज बॅनरचा सिनमा असल्यामुळे नकार देण्याचाही प्रश्न नव्हता.
'हँसी तो फँसी' सिनेमा न करता दोघांनीही यशराजचा ‘शुद्ध देसी रोमांस’ सिनेमामध्ये काम केले. दोघांची जोडीरसिकांनी खूप पसंत केली होती. अनुरागला परिणीती नकार देण्यासाठी कारण शोधत होती आणि म्हणून तिने सुशांतचे नाव पुढे करून 'हँसी तो फसी'साठी नकार दिला असल्याचे कश्यपने सांगितले.
थोडी तर मर्यादा पाळा...! लैंगिक शोषणाच्या आरोपावर अनुराग कश्यप अखेर बोलला
अभिनेत्री पायल घोष हिने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले. अनुराग कश्यपने या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत या आरोपांना उत्तर दिले़. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले.
या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’
कंगनाची मुलाखत बघितल्यावर अनुरागने पहिले ट्वीट केले होते. ‘काल कंगनाची मुलाखत बिघतली. एकेकाळी माझी चांगली मैत्रिण होती. माझ्या प्रत्येक सिनेमानंतर मला हिंमत द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. आत्ता तिचा हा भयावह इंटरव्ह्यू सुद्धा बघितला. जो मणिकर्णिका रिलीज झाल्यानंतरचा आहे,’ असे या ट्वीटमध्ये त्याने लिहिले. यानंतर त्याने कंगनावर आणखी बरेच ट्वीट केलेत.