या कारणामुळे रणवीर सिंग दीपिका पादुकोनबरोबरच्या रिलेशनशिपवर बोलणे टाळतो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2017 02:57 PM2017-02-09T14:57:31+5:302017-02-09T20:27:31+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारं कुठलं कपल असेल तर ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन हे आहेत. यांच्यातील नात्याबाबत ...

For this reason Ranvir Singh avoids speaking on the relationship with Deepika Padukone | या कारणामुळे रणवीर सिंग दीपिका पादुकोनबरोबरच्या रिलेशनशिपवर बोलणे टाळतो

या कारणामुळे रणवीर सिंग दीपिका पादुकोनबरोबरच्या रिलेशनशिपवर बोलणे टाळतो

googlenewsNext
्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारं कुठलं कपल असेल तर ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन हे आहेत. यांच्यातील नात्याबाबत कोणाला माहीत नसेल असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. मात्र या दोघांनी त्यांच्यातील नात्याविषयी जाहीरपणे सांगितले असेही कोणाला आठवत नसेल. खरं तर या दोघांनी कधीच त्यांचे नाते उघड केले नाही; तसेच त्यांच्या नात्याविषयी नकारही दिला नाही. दोघांच्या या भूमिकेबाबत नेमके काय कारण असू शकते हा त्यांच्या फॅन्सला पडलेला एकप्रकारचा गहन प्रश्नच म्हणावा लागेल. मात्र आता या प्रश्नाचा काहीसा उलगडा होताना दिसत आहे. रणवीर सिंग याने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले की, आमच्या पर्सनल लाइफला प्रोटेक्ट करण्यासाठीच आम्ही यावर कधीच बोलणार नाही. 



रणवीरने सांगितले की, मला असे वाटते की आमच्या नात्यावरून यापूर्वीही बराचसा तपास घेतला गेला आहे. मी या गोष्टीला अजिबात बढावा देऊ इच्छित नाही. कारण आम्ही आमचे व्यक्तिगत आयुष्य प्रोटेक्टिव्ह करू इच्छितो. मी माझ्या आयुष्यातील काही गोष्टी अजिबात जाहीर करू इच्छित नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. रणवीर आणि दीपिका संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात एकत्र काम करीत आहेत. दोघांनी यापूर्वी ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातही एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त भावत असल्याने हे दोन्ही बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. 

खरं तर रणवीर याच्याकडे ‘खुली किताब’ असे बघितले जाते. कारण तो जे काही बोलतो ते अगदीच बिनधास्त असते. त्याच्याविषयीची कुठलीच गोष्ट त्याने लपवून ठेवली नाही. जे काही सांगतो त्यात निश्चितच प्रामाणिकपणा असतो. मात्र दीपिकाबाबतच्या नात्याविषयी तो बोलणे नेहमीच टाळतो. याविषयी रणवीर म्हणतोय की, माझ्या या निर्णयाचा लोकही सन्मान करतील असे मला वाटतेय. असो, या दोघांनी जरी त्यांच्यातील नात्याविषयी जाहीरपणे सांगितले नसले तरी, त्यांच्यात कुठल्या प्रकारचे नाते आहे ही समज नक्कीच त्याच्या चाहत्यांना आहे. 

यावेळी रणवीरने संजय लीला भंसाळी याचे गोडवे गायिले. तो म्हणाला की, मला त्यांच्याकडून बरेचसे शिकायला मिळाले. त्यांनी माझ्यात एक अभिनेता अन् कलाकार म्हणून शोध घेतला आहे. त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीला आॅब्जर्व करूनच मी बरेचसे शिकलो आहे. लगातार तिसºया सिनेमामध्ये त्यांनी मला संधी देणे हा माझ्यासाठी खूपच मोठी बाब आहे. शिवाय हे माझे यशही आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जयपूर येथे ‘पद्मावाती’च्या शूटिंगदरम्यान राजपूत करणी सेनाच्या कार्यकर्त्यांनी संजय लीला भंसाळी यांच्यावर हल्ला केला होता. याविषयी बोलताना रणवीर म्हणाला की, सिनेमाची कथा खूपच रंजक आणि रोमांच निर्माण करणारी आहे. मला आनंद होत आहे की, इंडस्ट्रीमधील एक प्रभावशाली कलाकार शाहिद कपूर हा आमच्या टीममध्ये सहभागी झाला आहे.
 


रणवीर आदित्य चोपडा याच्या ‘बेफिक्रे’ या सिनेमात वाणी कपूर हिच्याबरोबर झळकला होता.
‘पद्मावती’नंतर तो जोया अख्तरबरोबर ‘गुल्ली बॉय’मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट असून, दोघांची जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांच्या केमिस्ट्रीवरही फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता बघावयास मिळत आहे. 

Web Title: For this reason Ranvir Singh avoids speaking on the relationship with Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.