बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देईल असे तिचे सौंदर्य आहे. सतत ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पण त्रिशालाने नेहमीच लोकांपासून आणि बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहीली.
संजय दत्त सध्या मुंबईत आपली तिसरी पत्नी मान्यता, मुलगी इकरा आणि मुलगा शहरानसोबत राहतो. संजय दत्तची आणखी एक लेक आहे. तिचे नाव त्रिशाला असून ती न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीसोबत राहते. संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची त्रिशाला ही लेक आहे. सध्या ती फॅशन जगतात नशीब आजमावत आहे. 2014 साली त्रिशालाने पहिली ड्रीम ट्रेसेस हेअर एक्स्टेन्शन लाईन सुरु केली. न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेजमधून तिने क्रिमिनल जस्टिस या विषयातून कायद्याची पदवीसुद्धा मिळवली आहे.
त्रिशालाने सिनेमात कधीही काम करु नये ही आपली इच्छा आहे असं संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. यापेक्षा तिने शालेय शिक्षण आणि कॉलेज शिक्षण पूर्ण करुन वेगळ्या क्षेत्रात करिअर करावं अशी संजय दत्तची इच्छा होती. सिनेमात येण्यासाठी बॉलीवुडची समज, इथल्या वातावरणाशी जुळवून घेणे गरजेचे असते.
हे ग्लॅमरचे जग आहे, मात्र इथे टिकून राहणं कठीण काम आहे असं संजय दत्तने म्हटले होते. संजय दत्तने 1987 साली रिचा शर्मासह लग्न केलं. 1988 साली संजय आणि रिचाच्या आयुष्यात त्रिशाला आली. मात्र रिचाला मेंदूचा ट्युमर होता. त्यामुळे 10 डिसेंबर 1996 रोजी रिचाचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीकडेच राहते.
मान्यता आणि त्रिशलाच्या बॉन्डिंगविषयी बोलताना सुरुवातीला दोघांचे संबंध चांगले नव्हते. काळानुसार त्यांच्यामध्ये चांगले बॉन्डींग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. दोघेही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करतात आणि लाईक करतात.एकदा मान्यताने त्रिशलाशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल सांगितले होते - १२ वर्षांपूर्वी मी त्रिशलासाठी एक ऑन्टी होती. तिने मला तिच्या आयुष्यात आईचा दर्जा दिला नव्हता. मात्र जसजसे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. तसतसे आमचे नातेही घट्ट झाले. पूर्वी मी तिच्यासाठी केवळ आन्टी होती, आता ती मला तिचीसुद्धा आई मानते. हे मिळवणे दोघांच्या समन्वयाने शक्य झाले की तिने मला आईचा हक्क दिला आहे.