या कारणामुळे सोनम कपूरची आजी लावणार नाही लग्नाला हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 6:41 AM
शबाना आझमी आणि कपूर कुटुंबियांचे संबंध खूपच चांगले आहेत. अनिल, बोनी कपूर यांच्यासोबत शबाना आझमी यांचे नाते खूपच जवळचे ...
शबाना आझमी आणि कपूर कुटुंबियांचे संबंध खूपच चांगले आहेत. अनिल, बोनी कपूर यांच्यासोबत शबाना आझमी यांचे नाते खूपच जवळचे आहे. शबाना आझमी सोनमला तर आपल्या नातीप्रमाणे मानतात. पण आपल्या या लाडक्या नातीचे लग्न शबाना मिस करणार आहेत. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे लग्न ८ मेला मुंबईत होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सध्या कपूर कुटुंबीय करत आहेत. या लग्नाला कपूर कुटुंबियांच्या जवळचे अनेक लोक तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. पण शबाना आझमी एका कामानिमित्त शिकागो येथे आहेत. त्यामुळे त्यांना सोनमच्या लग्नाला जाता येणार नाहीये. याबाबत युएसवरून एका वर्तमानपत्राशी बोलताना शबाना सांगतात, हे खरे आहे की, मी माझ्या लाडक्या सोनमच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. मी युएसमध्ये एका कामासाठी आली आहे आणि मी युएसमध्ये येणार हे तीन महिन्यापूर्वीच ठरले होते. सोनमच्या लग्नाला उपस्थित राहाण्याची माझी खूप इच्छा होती. पण सोनमच्या लग्नाची तारीख दोनदा बदलली आणि युएसमधील कार्यक्रमाच्या तारखा मी अनेक महिन्यांपूर्वी दिल्या असल्याने मला त्या बदलणे शक्य नव्हते. सोनमच्या लग्नाला हजेरी लावणे शबाना आझमी यांच्यासाठी शक्य नसले तरी त्यांनी युएसला जाण्याआधी त्या सोनमच्या घरी जाऊन आल्या होत्या. याविषयी शबाना सांगतात, मी युएसला येण्यापूर्वी अनिल, सुनीता यांच्यासोबतच होते. त्यांच्या घरी खूप सारी मस्ती, डान्सची प्रॅक्टिस सुरू होती. अनिल आणि त्याच्या कुटुंबियांसोबत आमची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. गेली ३० वर्षं आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. सोनमला अभिनेत्री बनायचे आहे असे तिने सर्वप्रथम घरी सांगितले, त्यावेळी अनिलने सोनमला माझ्याकडे पाठवले होते. मी तिचा हा निर्णय बदलावा असे त्याला वाटत होते. पण याउलट तुझ्या मनाला वाटत असेल तर नक्कीच या क्षेत्रात ये... असे मी तिला सुचवले होते. शबाना आझमी युएसमध्ये असल्याने त्यांना सोनमच्या लग्नात हजेरी लावता येणार नाही. पण त्यांचे पती लेखक जावेद अख्तर लग्नाला आवर्जून उपस्थिती लावणार आहेत. Also Read : सोनम कपूरच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?