कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सिनेमा हॉल बंद करण्यात आले होते. मात्र, आजपासून ( 15 ऑक्टोबर) सिनेमा हॉल सुरू करण्यात आले आहेत. नवीन सिनेमा वगळता जुनेच सिनेमा या महिन्यात प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यात 'केदारनाथ' सिनेमाचाही समावेस करण्यात आला आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विट केलेल्या लिस्टमध्ये केदारनाथ सिनेमाचे नाव देण्यात आले आहे. ‘केदारनाथ’सह ‘तान्हाजी’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘मलंग’ आणि ‘थप्पड’ हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. मात्र 'केदारनाथ' सिनेमा पुनप्रदर्शनावर रसिक नाराज आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
एका युजरने म्हटले आहे की, सुशांतच्या निधनाचे बाजार मांडून ठेवला आहे. त्याच्या नावार आता कित्येक निर्माते पैसे कमवतील. सुशांतच्या नावाची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी निर्माते काहीही करतील. पण रसिकही मुर्ख नाही. तर एकाने लिहीले आहे की, जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा त्याच्या केदारनाथ सिनेमाला थिएटर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
आता तो नाही त्याच्यानंतर सिनेमा पुनप्रदर्शित केल्याने काय साद्य होणार आहे. आता तो या जगात नाही. सुशांतला याचा फायदा होईल का? बॉलिवूडने त्याच्यासोबत खूप वाईट केले आहे हे विसरूनही चालणार नाही. तर एकाने म्हटले आहे, ‘आणखी किती दिवस सुशांतला विकणार आहात ?’, बस्स करा.
सिनेमागृहांमध्ये अशी असणार एंट्री
सिनेमागृहात प्रवेश करताना आपले तापमान तपासले जाणार आहे. आरोग्य सेतु अॅप तुमच्या फोनमध्ये आहे की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच, सिनेमागृहांमध्ये ५० टक्के प्रेक्षक असतील, या नियमांचे पालन केले जाईल. ज्याअंतर्गत प्रत्येकासाठी एक सीट सोडून बसण्याची व्यवस्था केली जाईल. सिनेमा संपल्यानंतर... सिनेमा संपल्यानंतर संपूर्ण हॉलचे सॅनिटायजेशन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्न आणि पेय पदार्थांसाठी एक विशेष युव्ही स्टॅरेलायजेशन कॅबिनेट ठेवण्यात येईल आणि ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी त्या वस्तूचे निर्जंतुकीकरण केले जाईल. तसेच, आधीच पॅक केलेले खाद्यपदार्थ याठिकाणी ठेवले जातील. याशिवाय, सिनेमागृहांमधील दरवाज्यांच्या हँडलवर एंट्री मायक्रोबियल शीट बसविण्यात आली आहे.