Join us

सनी लिओनीला भाड्याने दिलेल्या फ्लॅटचे वॉशरूम बघून सेलिना जेटलीचा झाला होता संताप; बजावली नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 9:00 AM

बॉलिवूडची लैला अर्थात सनी लिओनी हिच्या सौंदर्याचे आणि हॉट अंदाजाचे सगळेच दिवाने बनत आहेत. सध्या तर सनी इंडस्ट्रीमध्ये नवी सनसेशन ...

बॉलिवूडची लैला अर्थात सनी लिओनी हिच्या सौंदर्याचे आणि हॉट अंदाजाचे सगळेच दिवाने बनत आहेत. सध्या तर सनी इंडस्ट्रीमध्ये नवी सनसेशन बनली आहे. आतापर्यंत सनीने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या सनी दिग्दर्शक राजीव वालिया यांच्या आगामी ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामधून अरबाज खानदेखील पुन्हा एकदा पडद्यावर परतत आहे. अरबाजसोबत झळकणार असल्याने सनी सध्या चांगलीच चर्चेतही आहे. असो, आज आम्ही सनीच्या आयुष्याशी संबंधित एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. होय, जेव्हा सनीला अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिच्या फ्लॅटमधून बाहेर काढले होते. हा किस्सा २०१५ चा आहे. त्यावेळी सनी लिओनीला मुंबईत प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अडचण येत होती. तेव्हा बी-टाइनची अभिनेत्री सेलिना जेटली हिने सनीला मदत केली होती. मात्र त्यावेळी कदाचित सेलिनाला याबाबतचा अंदाज नसावा की सनी तिच्या मदतीचा गैरफायदा तर घेणार नाही ना? अशातही सेलिनाने सनीला तिचा मुंबई-अंधेरीतील फ्लॅट भाड्याने दिला. सनी आणि तिचा पती डेनियल वेबर या फ्लॅटमध्ये राहू लागले. पुढे काही दिवस गेल्यानंतर सेलिना एक दिवस अचानकच सरप्राइज व्हिजीट देत फ्लॅटमध्ये पोहोचली. फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तिला अक्षरश: धक्का बसला. ती फ्लॅटची अवस्था बघून दंग राहिली. असे म्हटले जाते की, फ्लॅटमध्ये सगळीकडेच घाण निर्माण झाली होती. भिंतीवर अनेक ठिकाणी जाळे लागले होते. बालकनीमध्ये फर्निचर सडत होते. शिवाय मार्बलही तुटले होते. त्याचबरोबर सनीने सेलिनाला न विचारताच फ्लॅटचे स्ट्रक्चर बदलून टाकले होते. घरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते. मात्र सेलिना दंग तेव्हा राहिली जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली. वॉशरूमची कंडिशन ऐवढी खराब होती की, त्यामध्ये जाण्याचे तिने धाडसच केले नाही. वॉशरूमच्या बहुतांश भागात घाण साचली होती. असे म्हटले जाते की, फ्लॅटची कंडिशन बघून संतापलेल्या सेलिनाने सनी आणि डेनियलला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्याचबरोबर तिच्याकडून नुकसानभरपाईही वसूल केली होती.