रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल आलिया म्हणते,‘आमच्या नात्याला नजर ना लागो..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 05:40 PM2019-06-23T17:40:08+5:302019-06-23T17:40:44+5:30

आमच्या नात्याला कुणाची नजर ना लागो.. सध्या आम्ही जो वेळ एकमेकांसोबत घालवत आहोत, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षण आहे.’ 

 Regarding the relationship with Ranbir, Alia says, 'Do not look at our Relationship'..' | रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल आलिया म्हणते,‘आमच्या नात्याला नजर ना लागो..’

रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल आलिया म्हणते,‘आमच्या नात्याला नजर ना लागो..’

googlenewsNext

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि चुलबुली गर्ल आलिया भट्ट हे बॉलिवूडच्या सध्याच्या सर्वांत हॉट कपलपैकी एक मानले जाते. ते अनेक अवॉर्ड सोहळयांमध्ये एकमेकांबद्दल खूप कौतुक करताना दिसले आहेत. ते सध्या हॉलीडेजवर एकमेकांसोबत  क्वालिटी टाइम घालवत आहेत. पुढच्या काही दिवसांतच त्यांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यानिमित्त झालेल्या एका मुलाखतीत रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल आलिया म्हणते,‘आमच्या नात्याला कुणाची नजर ना लागो.. सध्या आम्ही जो वेळ एकमेकांसोबत घालवत आहोत, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षण आहे.’ 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या जोडीची चर्चा होणे हे आता काही नवीन नाही. त्यांना एकमेकांबद्दल मैत्रीपेक्षाही जास्त काही वाटते, हे वेळोवेळी त्यांनी सिद्ध केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना आलिया म्हणते,‘ हे नाते नाही तर मैत्री आहे. हे मी पूर्णपणे प्रामाणिकपणे सांगते आहे. हे खूपच सुंदर आहे. मी सध्या आकाश आणि ताऱ्यांवर चालत आहे. आम्ही दोघे आहोत जे आपल्या प्रोफेशनल लाईफ लाही खुलेपणाने जगत आहोत. आम्ही दोघेही आपापल्या चित्रपटांचे शूटिंग करत आहोत. हे असे काही क्षण आहेत ज्यात तुम्ही आम्हाला एकमेकांसोबत बघाल. हीच खरंतर एका सहज आणि सरळ नात्याची खुण आहे. नजर ना लागो.’

आता एवढं सगळं बोलल्यावर अजून काही बाकी आहे? नाही ना. आलिया आणि रणबीर यांच्यातील नाते हे केवळ मैत्रीचे असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्याच्यासोबतच्या मैत्रीबद्दल ती म्हणते,‘रणबीरने मला माझ्या अडचणीच्या समयी खूप मदत केली. मला काळजी करायची खूप सवय होती. तेव्हा तो मला म्हणायचा की, तू तुझ्याकडून शंभर टक्के काम करतेस ना.. मग काळजी करू नकोस. तुला यश नक्की मिळणार. पण आता काळ एवढा सहज झाला आहे की, कुठल्याही स्ट्रेसची गरज नाहीये.’

Web Title:  Regarding the relationship with Ranbir, Alia says, 'Do not look at our Relationship'..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.