३० वर्षांनंतर पुन्हा एकदा रेखा आणि सलमान खान येणार एकत्र!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 8:25 AM
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांच्यासोबत झळकला होता. ...
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांच्यासोबत झळकला होता. वृत्तानुसार, आता पुन्हा एकदा हे दोघे तब्बल ३० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. होय, सलमान खान एवरग्रीन अभिनेत्री रेखासोबत ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटाच्या सिरीजमधील ‘यमला पगला दिवाना फिर से’ या चित्रपटात झळकणार आहे. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘यमला पगला दिवाना-२’नंतर देओल्स फॅमिली पुन्हा एकदा कॉमेडीचा तडका लावताना बघावयास मिळणार आहेत. मात्र या तिसºया भागात चक्क सलमान आणि रेखा स्पेशल नंबर देताना झळकतील. बॉलिवूड लाइफ डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, ‘चित्रपटात एका जुन्या क्लासिक सीक्वलचा समावेश करण्यात आला आहे. याच गाण्यात सलमान आणि रेखा एकत्र बघावयास मिळतील. वृत्तानुसार, चित्रपटातील हे गीत एका जुन्या एवरग्रीन हिट गाण्याचा रिमेक असेल. किशोरकुमार यांनी गायिलेले ‘रफ्ता-रफ्ता देखो आँख मेरी लडी है’ हे गीत अगोदर रेखा आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. आता याच गाण्यावर रेखा आणि सलमान ठुमके लावताना दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, फिल्ममेकर पुन्हा एकदा जुन्या प्रसंगांना रिक्रिएट करू इच्छितात. रेखा यांनी चित्रपटात कॅमिओ करण्यास होकारही दिला आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्यासोबत ठुमके लावताना बघावयास मिळतील. विशेष म्हणजे चित्रपटातील या गाण्याचे शूटिंग रेखा यांनी गेल्या बुधवारीच पूर्ण केली आहे. चित्रपटात शॉटगन शत्रुघ्न सिन्हा हेदेखील सलमान, रेखा आणि धर्मेंद्र यांच्यासोबत डान्स करताना बघावयास मिळतील. शत्रुघ्न सिन्हा देओल परिवाराचे खूपच जवळचे मित्र आहेत. दरम्यान, सलमान खान त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातही त्याने ‘यमला पगला दिवाना फिर से’ या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. सलमानचा ‘रेस-३’ १५ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.