बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे नाव येताच डोळ्यासमोर तिचे 'इन आखों की मस्ती के ... मस्ताने हजारों है' हे गाणे. रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने करोडो चाहत्यांना वेड लावले. आज या सुंदर अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. रेखा आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करतायेत. विशेष म्हणजे वयाची 65 वर्षे ओलांडली असूनही रेखा यांचे सौंदर्य पाहून सारेच त्यांच्या प्रेमात पडतात. तरूण अभिनेत्रींनाही लाजवेल असे त्यांचे सौंदर्य आजही टीकून आहे.
रेखा यांचे चिरतरुण सौंंदर्यमुळात रेखा या वयातही इतके फिट आहेत यामागेही एक खास रहस्य आहे ते म्हणजे योग्य रितीने घेतलेला आहार . नियमितपणे योगा करणे आणि मेडीटेशन करण्याला त्या प्राधान्य देतात. याकडे त्या कधीच दुर्लक्ष करत नाही. हे प्रत्येकालाच माहिती आहे की त्या रॉयल लाईफ जगतात. बऱ्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या सिल्कच्या महागड्या साड्या मौल्यवान दागिने परिधान केलेल्या दिसतात.